Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या योजनेतून मिळेल दुप्पट रिटर्न्स, इतके वर्ष करा गुंतवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Post Office Scheme पोस्ट ऑफिस सामान्य नागरिकांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजना आहेत. ज्याचा फायदा लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच होत असतो. पोस्ट ऑफिसची (Post Office Scheme) खासियत म्हणजे हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. शिवाय यातून खूप चांगला परतावा देखील मिळतो. त्यामुळे अनेक लोक हे गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसला प्राधान्य देतात.

पोस्ट ऑफिसची अशी एक खास योजना आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना केवळ त्यांच्या व्याजदरामध्ये लाखो रुपये कमावता येतात. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव ऑफिस टाईम डिपॉझिट योजना असे आहे. या योजनेमध्ये जर तुम्ही पाच वर्षे पैसे गुंतवले, तरी यातून तुम्हाला खूप चांगला परतावा मिळतो. एवढेच नाही तर तुमचे पैसे सुरक्षित असतात. या योजनेत तुम्हाला 7.5% दराने व्याज मिळते.

पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनेक छोट्या बचत योजनांपैकी ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेत चांगले व्याज मिळते. त्याचप्रमाणे फायदे देखील खूप होतात. त्यामुळे अनेक लोक या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत. 2023 मध्ये पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट या योजनेचा पाच वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध असलेल्या व्याजदर हा 7 टक्के होता. परंतु आता तो वाढून 7.5% एवढा करण्यात आलेला आहे. या योजनेतील आर्थिक सुरक्षिततेमुळे त्याचप्रमाणे चांगल्या परताव्यामुळे आता ही योजना गुंतवणूकदारांमध्ये चांगली लोकप्रिय होत चाललेली आहे.

व्याजदर किती मिळतो? | Post Office Scheme

या योजनेअंतर्गत तुम्ही वेगवेगळ्या कालावधीसाठी देखील गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष, किंवा पाच वर्षासाठी पैसे जमा करू शकता. या योजनेमध्ये तुम्ही एका वर्षासाठी गुंतवणूक केली, तर तुम्हाला एका वर्षानंतर 6.9% दराने व्याज मिळेल. तुम्ही जर या योजनेमध्ये दोन किंवा तीन वर्षासाठी गुंतवणूक केली तर 7 टक्के दराने व्याज मिळेल. परंतु जर तुम्ही 5 वर्षासाठी या योजनेत गुंतवणूक केली, तर तुम्हाला 7.5% दराने व्याज मिळेल. परंतु ग्राहकाची गुंतवणुक दुप्पट होण्यासाठी पाच वर्षापेक्षा जास्त काळ तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल.

पोस्ट ऑफिसच्या या टाईम डिपॉझिट स्कीममध्ये ग्राहकाला आयकर विभाग कायदा 1961 कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा देखील लाभ मिळतो. त्याचप्रमाणे या योजनेमध्ये एक खाते किंवा संयुक्त खाते देखील उघडता येते. दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलाला या योजनेमध्ये खाते उघडता येते. यामध्ये किमान1 हजार रुपये गुंतवणूक करता येतील. व्याजाचे पैसे या योजनेत वार्षिक आधारावर जोडले जातात. त्यामुळे तुम्ही देखील चांगल्या त्यामुळे तुम्ही देखील सुरक्षित गुंतवणुकीचा आणि चांगल्या परताव्यासाठी एखादी योजना शोधत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी अत्यंत चांगली योजना आहे.