8 वी पास उमेदवारांसाठी पोस्टात नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. इंडिया पोस्ट येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एम.व्ही.मेकॅनिक (कुशल), एम.व्ही. इलेक्ट्रिशियन, चित्रकार, वेल्डर, सुतार ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

विभाग – इंडियन पोस्ट

भरली जाणारी पदे –

एम.व्ही.मेकॅनिक (कुशल) – 01 पद

एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल) – 02 पदे

चित्रकार (कुशल) – 1 पद

वेल्डर (कुशल) – 01 पद

सुतार (कुशल) – 02 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवारास किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

एम.व्ही.मेकॅनिक (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये दरमहा

एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये दरमहा

चित्रकार (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये दरमहा

वेल्डर (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये दरमहा (India Post Recruitment)

सुतार (कुशल) – 19,900 – 63,200 रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.indiapost.gov.in या लिंकवर क्लिक करा