10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; टपाल जीवन विमा विभागात भरती जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दहावी उत्तीर्ण आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे. टपाल जीवन विमा विभागाने अभिकर्ता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. टपाल जीवन विमा दहावी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांच्या शोधात आहे. कारण या विभागाकडून, अभिकर्ता पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या इच्छुक तरुणांना या विभागाच्या पदांसाठी काम करायचे आहे त्यांनी 16 ऑक्टोंबर रोजी थेट मुलाखतीसाठी मुंबई येथील टपाल जीवन विमा विभाग येथे उपस्थित रहावे. इतर सर्व माहिती खाली नमूद करण्यात आली आहे.

(Postal Life Insurance) टपाल जीवन विमा मुंबई येथील विभागात अभिकर्ता पदाच्या विविध जागांची भरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात देखील विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार या पदावर काम करण्यासाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. या उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. येत्या 16 ऑक्टोंबर रोजी ही मुलाखत (प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई – ४०००५७) येथे घेण्यात येणार आहे.

सविस्तर माहिती

विभाग – टपाल जीवन विमा

पदाचे नाव – अभिकर्ता

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – कमीत कमी अठरा वर्षे / जास्तीत जास्त वयोमर्यादा नाही

निवड प्रक्रिया – थेट मुलाखतीद्वारे

वेतन – या पदासाठी नोकरी प्रमाणे वेतन नाही. उमेदवारांना पोस्टाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे कमिशन/भत्ता दिला मिळेल.

मुलाखतीचा पत्ता – प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई – ४०००५७

मुलाखतीची तारीख – 16 ऑक्टोबर 2023

मुलाखतीची वेळ – सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत

कागदपत्रे – पॅन कार्ड झेरॉक्स ,आधार कार्ड झेरॉक्स, शैक्षणिक प्रमाणपत्र, 3 पासपोर्ट साईज फोटो

सर्व इच्छुक उमेदवारांनी 16 ऑक्टोंबर रोजी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. यावेळी येताना मुलाखतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणावीत. या मुलाखतीतून निवडलेल्या उमेदवारांना परवाना परीक्षा द्यावी लागेल. परवाना परीक्षा नंतर त्यांना कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात येईल. उमेदवारांना तात्पुरता परवाना मिळवण्यासाठी 50 रुपये तर परीक्षेसाठी 400 रुपये शुल्क भरावे लागेल..

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत प्रक्रिये द्वारे होणार आहे. उमेदवारांनी संबंधित तारखेला म्हणजे 16 ऑक्टोबर रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहणे गरजेचे आहे. कागदपत्रे जाहिरातीत नमूद केलेली आहेत. या मुलाखतीतून निवडलेल्या उमेदवारांना परवाना परीक्षा देणे गरजेचे आहे. परवाना परीक्षे नंतर त्यांना कामकाजाचे प्रशिक्षण दिले जाईल. उमेदवारांना तात्पुरता परवाना मिळवण्यासाठी 50  रुपये तर परीक्षेसाठी 400 रुपये शुल्क भरावे.