Tuesday, February 7, 2023

भाजपशासित कर्नाटकात राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’चे पोस्टर फाडले

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा देशभर चर्चेत आहे. आज ही यात्रा भाजपाची सत्ता असलेल्या कर्नाटकात आली आहे. मात्र त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे पोस्टर फाडल्याचा प्रकार घडला आहे. हा गैरप्रकार कोणी आणि का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस नेते भाजप कार्यकर्त्यांवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

काँग्रेसने सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्या फाडलेल्या पोस्टरचे फोटो शेअर केले. भाजप शासित कर्नाटकात भारत जोडो यात्रेचे पोस्टर्स फाडण्यात आले. ‘भारत जोडो यात्रा’ या रागाच्या, या द्वेषाच्या, या हिंसाचाराच्या राजकारणाच्या विरोधात आहे. आपल्या देशाचा प्रभाव द्वेषाचा नाही असे म्हणत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

https://www.instagram.com/p/CjH8Rekp801/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, कर्नाटकात एन्ट्री करताच राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भारत जोडो यात्रेचा उद्देश तुम्हाला भाषण देणे नसून तुमच्या समस्या ऐकणे हा असल्याचे राहुल गांधींनी म्हंटल. महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांवर होणारे अत्याचार आणि सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्सचे खाजगीकरण या विरोधात लोकांचा संघर्ष आहे.

लोकशाहीत वेगवेगळ्या संस्था असतात. प्रसारमाध्यमे आणि संसदही आहे, पण विरोधकांसाठी हे सर्व बंद करण्यात आले आहे आणि मीडिया आमचे ऐकत नाही. पूर्णपणे सरकारचे नियंत्रण आहे . संसदेत आमचे माईक बंद केले जातात, विधानसभा चालू ठेवल्या जात नाहीत आणि विरोधकांना त्रास दिला जातो. अशा परिस्थितीत आमच्यापुढे फक्त ‘भारत जोडो यात्रे’चाच पर्याय उरला होता असे राहुल गांधींनी म्हंटल.