जोरदार शक्तिप्रदर्शन!! लटकेंचा अर्ज भरण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी तर पटेलांसाठी शिंदे गट-रिपाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । शिवसेनेचे दिवंगत नेते आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आणि भाजप कडून मुरजी पटेल याना उमेदवारी देण्यात आली आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून अर्ज दाखल करण्यापूर्वी दोन्ही नेत्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणुक असल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह भरलेला आहे.

राज्यात महाविकास आघाडी एकत्र असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ऋतुजा लटके यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आज अर्ज भरण्यासाठी जात असताना आदित्य ठाकरे, अनिल परब, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह महाविकास आघाडीतले नेते सहभागी झाले. तर दुसरीकडे भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या रॅलीत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर, शिंदे गटाचे दीपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्यासह इतर नेते सहभागी होते. दोन्ही नेत्यांकडून आपलाच विजय होईल असा दावा करण्यात येत आहे.

2019चे समीकरण काय होत ?

दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल यांनी दिवंगत रमेश लटके यांना कडवं आव्हान दिले होते. शिवसेना- भाजप युतीत ही जागा शिवसेनेकडे होती. त्यावेळी रमेश लटके यांना 62 हजार 773 मतं मिळाली. तर अपक्ष लढलेल्या मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मतं होती. मुरजी पटेल यांना तेव्हाही भाजपने अंतर्गत पाठिंबा दिला होता अशा चर्चा सुरु होत्या. तर त्यावेळी काँग्रेस उमेदवाराला अवघी 28 हजार मते मिळाली होती.