हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PPF Account) पगारदार व्यक्ती आपल्या मासिक वेतनाचा एक छोटासा हिस्सा भविष्य निधिच्या रूपात सुरक्षितता म्हणून जमा करतात. सेवानिवृत्त झाल्यावर नोकरी थांबते मात्र खर्च आहेत तेच राहतात आणि अशावेळी हा निधी कमी येतो. सरकारमान्य सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी म्हणजेच पीपीएफ योजना पगारदार वर्गासाठी अत्यंत लाभकारी आहे. शिवाय ही योजना सरकारमान्य असल्यामुळे यातील गुंतवणूक सुरक्षित राहते. त्यामुळे कोणतीही पगारदार व्यक्ती बँक किंवा पोस्टात पीपीएफ खाते सुरू करून याचा लाभ घेऊ शकते.
जर तुम्हीही पीपीएफ योजनेत गुंतवणूक करत आहात आणि काही कारणास्तव हे खाते मॅच्युरिटीआधी बंद करायचा विचार करत असाल तर तसे करू नका. यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. (PPF Account) आज आपण याविषयी अधिक आणि सविस्तर माहिती घेणार आहोत. म्हणजे तुमचे नुकसान होणार नाही. पीपीएफ योजनेचा एकूण कालावधी १५ वर्षाचा असतो. मात्र, या कालावधीआधी तुम्हाला खाते बंद करायचे असेल तर त्यापूर्वी तुम्हाला काही नियम माहित असायला हवेत. ज्याविषयी आज आपण जाणून घेत आहोत.
PPF खाते बंद करण्याचे नियम (PPF Account)
जर तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक करत आहात आणि गुंतवणुकीला सुरुवात करून काही वर्षे उलटली आहेत. तर तुम्ही ही योजना मधूनच बंद करण्याचा निर्णय हौस म्हणून घेणार नाही हे नक्की. मग, एखादी अशी वेळ आलीच की तुम्हाला मॅच्युरिटीपूर्वी हे खात बंद करावे लागणार असेल तर त्यासाठी काही नियम आहेत. ज्यांची तुम्हाला माहिती हवी. समजा तुम्हाला तुमचे PPF खाते मॅच्युरिटीआधी बंद करायचे असेल तर तुम्ही गुंतवणुकीस ५ वर्षांनी हे खाते बंद करू शकता. मात्र, यासाठी तुमच्याकडे निर्धारित कारण असायला हवे. मुख्य बाब अशी कि, ५ वर्षांनंतर PPF कर्ज उपलबध केले जाते. मात्र, खाते बंद होत नाही. यासाठी खालील अटींची पूर्तता आवश्यक आहे.
अट १ – खातेधारक वा त्याच्या कुटुंबातील सदस्य (जोडीदार किंवा मुलं) एखाद्या जीवघेण्या आजाराने त्रस्त असेल आणि उपचारांसाठी पैशांची गरज असेल तर PPF खाते मुदतीआधी बंद करता येईल. (PPF Account)
अट २ – जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला पैशांची गरज असेल तर हे खाते मुदतपूर्व बंद करू शकता.
अट ३ – खातेदाराची रहिवासी स्थिती बदलल्यास म्हणजेच खातेधारक अनिवासी भारतीय झाल्यास हे खाते मुदतीआधी बंद करता येते. (PPF Account)
अट ४ – खातेधारकाचा मृत्यू झाला तर या परिस्थितीत ५ वर्षांचा नियमसुद्धा लागू होत नाही. त्यामुळे हे खाते त्वरित मुदतपूर्तीपूर्वी बंद केले जाऊ शकते.
PPF खाते बंद करण्याची प्रक्रिया काय?
मुदत पूर्ण होण्याआधी पीपीएफ खाते बंद करायचे असेल तर बँक खात्याच्या होम ब्रान्चमध्ये लेखी अर्ज द्यावा लागतो. ज्यात तुम्हाला खाते बंद करण्याचे कारण स्पष्ट करावे लागेल. (PPF Account) तसेच या अर्जासोबत काही महत्वाचे कागदपत्र जोडावे लागतील. यात पीपीएफ पासबुकची प्रत, तसेच, तुम्ही आजाराच्या उपचारासाठी खाते बंद करत असाल तर डॉक्टरांनी दिलेली कागदपत्रे, उच्च शिक्षणासाठी खाते बंद करत असाल तर फीची पावती वा प्रवेशाची पुष्टी करणारी कागदपत्रे, खातेदाराचा मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र असे महत्वाचे कागदपत्र जोडावे लागतात.
या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर खाते बंद करण्याचा अर्ज स्वीकारला जातो आणि खाते बंद होते. (PPF Account) मात्र, पीपीएफ खाते मॅच्युरिटीपूर्वी बंद केले असता यातून १% व्याज कापून पैसे परत केले जातात. त्यानुसार, दंडाची जी काही रक्कम असेल ती यातून कापली जाईल.