उरमोडीच्या पाण्यात अंघोळी करणाऱ्यांनी माण-खटावला पवारांमुळे पाणी आले हे विसरू नये; प्रभाकर देशमुखांचा गोरेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या व्यक्तीने यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने यशवंतनीतीने चालताना देशात आपल्या कर्तृत्वाने योगदान दिले. त्यांच्याबद्दल बोलताना जरा बोलणाऱ्यांनी देखील भान बाळगणे गरजेचे आहे. ज्या उरमोडीच्या पाण्यात नेहमी अंघोळीचा कार्यक्रम करतात. त्यांनी माण-खटावमध्ये खासदार पवार यांच्या प्रयत्नामुळे पाणी आले आहे हे विसरू नये, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांना लगावला.

प्रभाकर देशमुख यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला. देखमुख म्हणाले की, लबाडी व फसवणुकीवर ज्यांची राजकीय कारकीर्द उभी आहे. स्वार्थासाठी जे काहीही करायला तयार असतात. ते स्वतःच्या प्रसिद्धीसाठी बडबड करत खासदार शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. अशा लोकांना पवार साहेबांचे योगदान काय कळणार?

उरमोडी धरण पूर्ण झाल्यानंतर तीन-चार वर्षे ते पाणी धरणात तसेच पडून होते. उरमोडी जोड कालव्यातून कण्हेर कालव्यामध्ये पाणी नेण्यास शेतकऱ्यांचा विरोध होता. मी विभागीय आयुक्त असताना जिल्हाधिकारी रामास्वामी एन. यांना सोबत घेऊन खासदार पवार यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.

त्यानंतर खासदार पवार साहेबांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना बोलावून उरमोडी जोड कालव्याच्या कामास संमती देण्यास सांगितले. शिवेंद्रसिंहराजे यांनी ती संमती मिळवून दिल्यानंतर फक्त दोन महिन्यांत जलसंपदा विभागाने तो कालवा पूर्ण केला. त्यानंतर उरमोडीचे पाणी माण-खटावमध्ये आले, ही वस्तुस्थिती असल्याचे देशमुख यांनी म्हंटले.