Pradhan Mantri Suraksha Bima Yojana | आपल्या भविष्याचा विचार करून अनेक लोक हे आपला आरोग्य विमा काढत असतात. त्याचप्रमाणे सरकारकडून देखील अनेक विमा योजना आलेल्या आहे. अनेक घटकांचा विचार करून त्यांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना चालवली आहे. आज आपल्या देशात अशी कितीतरी लोक आहेत ते अत्यंत कठीण आर्थिक परिस्थिती सामना करतात.
त्यांची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना हा जीवन विमा काढता येत नाही. परंतु जर त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला काही झाले किंवा त्यांचा अकाली मृत्यू झाला तर संपूर्ण कुटुंबाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे सरकारने या कुटुंबांचा विचार करून ही नवीन विमा योजना चालू केलेली आहे. सरकारच्या या योजनेमध्ये नागरिकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा वार्षिक 20 रुपयांच्या खर्चावर सरकारने उपलब्ध केला आहे.
म्हणजेच दर महिन्याला 2 रुपयांपेक्षा देखील कमी खर्च या योजनेमध्ये आपल्याला होतो. लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास नॉमिनी किंवा कुटुंबाला ते 2 लाख रुपये मिळतात. तुम्हाला जर हा विमा खरेदी करायची असेल तर त्यासाठी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. तर आता आपण सरकारच्या विमा योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांची मदत
अपघातात जर एखाद्या व्यक्तीचे दोन्ही डोळे दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावले असल्यास कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला जातो. अपघातात एक डोळा, एक हात किंवा एक पाय गमावल्यास त्यांना 1 लाख रुपयांचा विमा सरकार द्वारे दिला जातो.
या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार | Pradhan Mantri Suraksha Bima Yojana
- सरकारचा हा विमा करण्यासाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणे गरजेचे आहे. आणि 70 वर्षापर्यंतच्या लोकांनाच या विम्याचा लाभ घेता येतो.
- भीमा संरक्षणाचा कालावधी हा 1 वर्षाचा असणार आहे तो 1 जून ते एक 31 मे पर्यंत असेल.
या योजनेचा लाभ कुठे मिळेल
- सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांमध्ये या योजनेचा विमा काढता येतो.
- बँकेच्या कोणत्याही शाखेतून तुम्ही पंतप्रधान सुरक्षा योजनेचा लाभ घेऊ शकता.
- जिथे तुमच्या बँक खाते असते तिथे सुविधा देखील उपलब्ध असते.
- PMSBY चे लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँक खाते असणे गरजेचे आहे.
- तुमच्याकडे जरी एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती असली तरी तुम्ही केवळ एकाच बँकेतून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- दरवर्षी 31 मे रोजी ऑटो डेबिट सुविधा द्वारे तुमचा बँक खात्यातून वीस रुपयांचा प्रीमियम कापला जाईल.
- जर ही पॉलिसी नूतनीकरण करण्यासाठी तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम नसेल तर तुमची पॉलिसी रद्द केली जाईल .
- या योजनेअंतर्गत नाव नोंदणीचा कालावधी 1 जून ते 30 मे पर्यंत आहे.
- अपघात झालास 30 दिवसांच्या आत पैशांचा दावा केला पाहिजे.