ठाकरेंनी ठाण्यातून विधानसभा लढवल्यास….; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी आगामी निवडणुकांसाठीची पक्षाची रणनीती सांगितली. तसेच, “आम्ही आता महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करू, आगामी निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होतील. त्यामुळे आम्ही कामाला लागलो आहोत. आमच्या पुढील सभा लातूर, सातारा, बीड, सटाणा येथे होणार असल्याची माहिती यावेळी प्रकाश आंबेडकरांनी दिले. मुख्य म्हणजे, आज प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेसोबत केलेल्या युती संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.

आम्ही युतीधर्म पाळणार…

माध्यमाची संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, “विधानसभा निवडणुकीपर्यंत आम्ही युतीत असलो आणि आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणूक जर ठाण्यातून लढवली तर मी त्यांच्या प्रचाराला जाणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तरी मी युतीधर्म पाळणार. मी पॉलिटिकल क्लिअर आहे. काँग्रेस आणि शरद पवारांचा अदानींसंदर्भात नरोबा, कुंजोबा सुरु आहे तसं आमचं नाही”

त्याचबरोबर, “आमचे दरवाजे काँग्रेससाठी कधीही उघडे आहेत. आमच्या पहिलं टार्गेट आरएसएस आणि भाजपला थांबवण्याच आहे. ज्या पक्षांना काँग्रेसमध्ये सिरियसली घेतलं जात नाही. असे नेते वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी व्हा असे सांगतात. परंतु त्यांनी काँग्रेसला विचारावे की, वंचित नाही पाठवलेल्या पत्रावर काँग्रेस अद्याप भूमिका का घेत नाहीये?, आम्ही पाठवलेल्या पत्राचं काँग्रेसच्या अध्यक्षांकडून अद्याप उत्तर आलेलं नाही.” असे प्रकाश आंबेडकरांनी म्हणले आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्ष  तयारीला लागले आहेत. आज वंचित बहुजन आघाडीने देखील आगामी निवडणुकांसाठीची आपली पुढील रणनीती सांगितली आहे. मुख्य म्हणजे, आज प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत कायम असलेल्या युती संदर्भात देखील भाष्य केले आहे. “आम्ही युतीधर्म पाळू, तसेच आदित्य ठाकरे हे ठाण्यातून उभे राहिले तर मी त्यांच्या प्रचाराला जाईल” असे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.