भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार; प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची घेतल्याने शिंदे- आंबेडकर एकत्र येणार अशी चर्चा होऊ लागली. मात्र, ‘प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम’ वेबसाईटच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर एकत्र आले. आणि प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत एकत्र यायचे स्पष्ट संकेत दिले.

आंबेडकरांनी दिलेल्या संकेतामुळे भाजप-शिंदे सरकारविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साथ मिळणार आहे. या कार्यक्रमावेळी प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आगामी निवडणुकीत शिवसेना आणि वंचित एकत्र भाजपविरोधात लढणार आहे.

महाराष्ट्रात सध्या असणारे राज्य हे सुप्रीम कोर्टाच्या स्टे ऑर्डरवर सुरु आहे. सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की, त्यांनी स्टे ऑर्डरच्या याचिकेबाबत ताबोडतोब निर्णय घ्यावा. शिवसेनेसोबत एकत्र कधी येणार हे निवडणूक कधी लागणार यावर अपेक्षित आहे. तात्काळ निवडणूक झाली तर लगेच एकत्र येऊ. नंतर निवडणूक लागली तर नंतर एकत्र येऊ, असे आंबेडकरांनी म्हंटले.