‘मविआ’मध्ये ‘वंचित’ राहणार की बाहेर पडणार? आज प्रकाश आंबेडकर करतील भूमिका जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना देखील महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळेच “हा तिढा 26 मार्चपर्यंत सोडण्यात आला नाही, तर आम्हाला ही आमची भूमिका घ्यावी लागेल” असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे. त्यामुळे आज दिवसभरात जागा वाटपाविषयी महाविकास आघाडीकडून कोणतीही घोषणा करण्यात आली नाही तर स्वतः प्रकाश आंबेडकर आज आपली भूमिका स्पष्ट करू शकतात.

मुख्य म्हणजे, शेवटच्या टप्प्यापर्यंत महाविकास आघाडीने जागा वाटपासंदर्भात योग्य निर्णय घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडीसोबत महाविकास आघाडीने केलेली युती देखील तुटू शकते. त्यामुळे असे काही घडल्यास पुढे जाऊन प्रकाश आंबेडकर नेमकी कोणती भूमिका घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी समाधानकारक जागा न मिळाल्यामुळे नाराज आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आघाडीने जागा वाटपाचा निर्णय मार्गी लावावा असे वंचितकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान महाविकास आघाडीमध्ये वंचितचा समावेश करून घेतल्यानंतर आघाडीकडून वंचितला चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. परंतु हा प्रस्ताव वंचितने फेटाळून लावला आहे. तर दुसऱ्या बाजूला, आम्ही आंबेडकर यांना एकूण 4 जागांचा प्रस्ताव दिला आहे तो कायम आहे. यासंदर्भात अजून काही चर्चा सुरू आहेत” अशी माहिती संजय राऊतांकडून देण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडीत आज आघाडीकडून जागा वाटपाविषयी तोडगा काढण्यात आला नाही किंवा वंचितला कोणताही निरोप देण्यात आला नाही तर दुपारपर्यंत प्रकाश आंबेडकर आपली ठोस भूमिका पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील.