प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी; शिवरायांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणे पडले महागात

Prashant Koratkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी दिल्याचा ठपका असलेल्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता प्रशांत कोरटकरचा कोल्हापुरातील मुक्काम आणखी वाढला आहे. महत्वाचे म्हणजे, काल गेल्या महिनाभरापासून फरार असलेल्या कोरटकरला तेलंगणातून अटक आले. यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली गेली.

सात दिवसांच्या कोठडीची मागणी

मीडिया रिपोर्टनुसार, कोरटकर गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. कोल्हापूर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती. अखेर सोमवारी दुपारी तेलंगणामधून त्याला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर कोल्हापूर पोलिसांचे पथक त्याला घेऊन आज पहाटेच कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या चौकशीसाठी पोलीस सात दिवसांच्या कोठडीची मागणी करणार होते.

त्यानुसार सात दिवसांच्या कोठडीचे मागणी सरकारी वकील यांनी न्यायालयात केली. मात्र, जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एस. तट यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. त्यामुळे आता सात दिवसांच्या ऐवजी फक्त तीनच दिवस कोरटकर कोल्हापुरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात काढावे लागणार आहेत.

दरम्यान, प्रशांत कोरटकरला न्यायालयात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळताच कोल्हापुरातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने न्यायालय परिसरात गर्दी केली होती. यावेळी,
शिवप्रेमींनी न्यायालय परिसरात घोषणाबाजी केली आणि कोरटकरला पाहून संताप व्यक्त केला. यामुळे पोलिसांनी संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला. परंतु, सुनावणीनंतर कोरटकरला न्यायालयाच्या बाहेर आणण्यात येत असताना एका संतप्त व्यक्तीने त्याच्यावर चप्पल फेकली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.