हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2025 च्या महाकुंभ मेळाव्यासाठी प्रयागराजमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. यामध्ये प्रमुख म्हणजे प्रयागराज विमानतळाचा विस्तार महत्वाचा ठरणार आहे. केंद्रीय मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी अलीकडेच विमानतळाचा दौरा करून महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत . त्यामध्ये त्यांनी सांगितले कि , यात्रेकरूंना प्रयागराजपर्यंत सहज पोहोचवण्यासाठी तब्बल 23 शहरांसाठी थेट उड्डाण सेवा सुरू केली जाणार आहे. या बातमीमुळे अनेक प्रवाशांना आनंदाची बातमी मिळाली आहे.
23 शहरांसाठी थेट उड्डाणे
महाकुंभ काळात यात्रेकरूंना प्रयागराजपर्यंत सहज पोहोचवण्यासाठी 23 शहरांसाठी थेट उड्डाण सेवा सुरू केली जाणार आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, लखनऊ, हैदराबाद, चेन्नई, पटना, नागपूर आणि अयोध्या यांसारख्या शहरांचा समावेश आहे. सध्या प्रयागराज विमानतळावर इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट, आणि ट्रुजेट सारख्या विमान कंपन्यांची उड्डाणे चालू आहेत.
नवीन टर्मिनल इमारतीचे बांधकाम
विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे, जे डिसेंबर 2024 पर्यंत सुरु होईल. या टर्मिनलमध्ये एकाच वेळी 850 प्रवाशांची सोय होणार आहे. कोहरे आणि रात्रीच्या वेळी उड्डाणे नीट चालण्यासाठी CAT-2 लाइटिंग तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. तसेच महाकुंभ काळात प्रवाशांना मदत करण्यासाठी विमानतळावर मे आय हेल्प यू डेस्क उभारण्यात येणार आहे. येथे विविध भाषांतील कर्मचारी प्रवाशांना महाकुंभ क्षेत्र, घाट, आणि इतर सुविधांची माहिती देणार आहेत.
विमानतळाच्या विस्तारासाठी निधी
प्रयागराज विमानतळाच्या विस्तारासाठी 175 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. या विस्तारामुळे महाकुंभसाठी लाखो देश-विदेशातील श्रद्धाळूंना सुविधा मिळणार आहेत. तसेच महाकुंभ 2025 च्या आध्यात्मिक आणि भव्यतेला समृद्ध करण्यासाठी शिवालय पार्क तयार करण्यात येत आहे. 14 कोटी रुपयांच्या खर्चाने उभारले जाणारे हे पार्क भारतीय संस्कृती, मंदिरांचे महत्त्व आणि पुराणकालीन दिव्यतेचे दर्शन घडवणार आहे.