Union Budget 2020 | सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दादाभाई नौरोजी यांच्यासारख्या नेत्यांनी भारतातली संपत्ती ब्रिटनमध्ये कशी वाहून नेली जाते हे दाखवून देत भारतीयांना जागं करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून स्वातंत्रपूर्व भारताचा अर्थसंकल्प नेमका कसा होता हे थोडक्यात पाहुयात.
१७९० साली ईस्ट इंडिया कंपनीने पहिल्यांदा कच्चा अर्थसंकल्प तयार केला होता. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर १८५८ साली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीने काढून घेतली. ईस्ट इंडिया कंपनीची भारतातली सत्ता संपुष्टात आल्यानंतर भारतीय परिषदेचा अर्थसदस्य जेम्स विल्सन याने १८ फेब्रुवारी १८६० रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. आर्थिक बाबीसंदर्भात वाईसरॉयला सल्ला देणे हे त्यावेळी अर्थसदस्याचं काम होत.
१९०९ च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानंतर या अर्थ सदस्यला दरवर्षी पहिल्या तिमाहीत केंद्रीय विधिमंडळाला अंदाजपत्रक सादर करावं लागत असे. केंद्रीय विधिमंडळात त्यावर चर्चा होत असे. परंतु विधिमंडळात अंदाजपत्रकांच्या बाबतीत सदस्यांनी केलेल्या मागण्या स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा सर्वाधिकार अर्थसदस्याला असे. परंतु या मागण्या आपण का स्वीकारल्या अथवा का नाकारल्या याच स्पष्टीकरण देणे त्याच्यावर बंधनकारक होतं.
सुरुवातीला रेल्वे अर्थसंकल्प हा सर्वसाधारण अर्थसंकल्पाचाच भाग होतं. परंतु १९२४ साली ऑक्वर्थ समितीच्या शिफारशीनुसार रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडण्यात येऊ लागला. स्वतंत्र आणि एकत्रित भारताचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी १९४९-५० साली सादर केला. नियोजन आयोग निर्माण करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात जाहीर केला होता.
इतर महत्वाच्या –
अर्थसंकल्प : मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट
अर्थसंकल्प2019- महिलांसाठी काय आहे ह्या अर्थसंकल्पा मध्ये?
… या कारणामुळे केला होता स्वतंत्र ‘रेल्वे अर्थसंकल्प’ बंद!
अर्थसंकल्प – आज पर्यंत माहित नसलेल्या गोष्टी
अर्थसंकल्प २०१९- बेरोजगारीचे संकट कसे पेलवणार अर्थमंत्री