Premji Invest : अझीम प्रेमजी उतरणार बँकिंग क्षेत्रात; खरेदी करणार ‘या’ बँकेतील हिस्सा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी आता बँकिंग क्षेत्रात आपलं नशीब आजमावणार आहेत. झीम प्रेमजी यांची कौटुंबिक फर्म प्रेमजी इन्व्हेस्ट (Premji Invest) लवकरच बँक ऑफ बडोदाची उपकंपनी असलेल्या नैनिताल बँकेतील मोठा हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. त्याबाबत बोलणी सुरु असून हा करार अंतिम टप्प्यात आल्याचे बोललं जात आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय होईल. नैनिताल बँकेचे मुख्यालय उत्तराखंड येथे असून या बँकेचे बाजरी मूल्य अंदाजे 800 कोटी रुपये आहे.

इकॉनॉमीस अहवालानुसार, प्रेमजी इन्व्हेस्टने टर्म शीटवर स्वाक्षरी केली असून महत्त्वाच्या मुद्द्यांवर वाटाघाटी अंतिम झाल्या आहेत. मात्र, अधिग्रहणाबाबत अजून तरी अंतिम निर्णय झालेला नाही. सूत्रांचे म्हणणे आहे की पहिल्या टप्प्यात सुमारे 51 टक्के शेअर्सची विक्री केली जाईल आणि उर्वरित शेअर्सची मालकी निर्गुंतवणूक केली जाईल. सध्या बँक ऑफ बडोदाचा नैनिताल बँकेत सुमारे ९८ टक्के हिस्सा आहे, ती आपला संपूर्ण हिस्सा विकू शकते.

बँकिंग क्षेत्रातील पहिले पाऊल- Premji Invest

खरं तर प्रेमजी इन्व्हेस्ट ही $10 अब्जाहून अधिक मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या म्हणून भारतातील स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सक्रिय सहभागासाठी ओळखली जाते. पॉलिसीबाझार, लेन्सकार्ट आणि क्रेडिटबीसह विविध उपक्रमांमध्ये या कंपनीचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. आता प्रेमजी इन्व्हेस्ट (Premji Invest) बँकिंग क्षेत्रात उतरत आपलं नशीब नव्याने आजमावणार आहे. कंपनी आधीच नॉन-बँकिंग फायनान्सशी संबंधित आहे, त्यामुळे बँकिंग क्षेत्रात थेट गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. नैनिताल बँक निर्गुंतवणूक योजनेत सहभागी होण्यासाठी RBI तांत्रिकदृष्ट्या सक्षम कंपनी शोधत आहे. याचे कारण म्हणजे कंपनीत तांत्रिक बदल घडवून आणावे लागले. अशा परिस्थितीत, इतर अनेक फिनटेक कंपन्या आणि गुंतवणूकदारांनी त्यात रस दाखवला. यामध्ये Zerodha, MobiKwik यांचाही समावेश आहे. नियामक फाइलिंगनुसार, नैनिताल बँक उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये 168 शाखांचे नेटवर्क चालवते.