प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान दुर्भाग्यजन्य; राष्ट्रपती कोविंद यांच्याकडूनही शेतकर्‍यांवरच निशाणा अन् सरकारची वाहवाह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान दुर्भाग्यजन्य असल्याचे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज व्यक्त केले. माझे सरकार नेहमीच संविधानिक आंदोलनांचा सन्मान करत आले आहे. मात्र मागील काही दिवसांत तिंरगा आणि प्रजासत्ताक दिनाचा अपमान दुर्भाग्यजनक असल्याचे राष्ट्रपती यावेळी म्हणाले. लोकसभेत आज राष्ट्रपतींचे अभिभाषण झाले. त्यावेळी बोलताना राष्ट्रपती कोविंद यांनी शेतकर्‍यांवर निशाणा साधत सरकारची वाहवाह केली आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरूवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरकारनं मागील वर्षभरात करण्यात आलेल्या कामांचा उहापोह करतानाच आगामी काळात केल्या जाणाऱ्या योजनांवरही प्रकाश टाकला. केंद्र सरकारच्या कामाचं कौतुक करताना राष्ट्रपतींनी आत्मनिर्भरतेचा पुनरुच्चार केला. करोना काळात होत असलेलं हे अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भाषण लाईव्ह

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment