बुलडाणा प्रतिनिधी । बलात्कार व पोक्सो गुन्ह्यांतर्गत बुलडाणा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याच्या मृत्यू डाक्कादायक घटना समोर अली आहे. शालिग्राम पांडुरंग उंबरकर (वय ६०) असं मयत कायद्याचं नाव असून गुरुवारी पहाटे जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील रहिवाशी असलेल्या शालिग्राम पांडुरंग उंबरकर (वय ६०) यांच्यावर २०१७ मध्ये नांदुरा पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल आहे. शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सदर आरोपीला नांदुरा पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून उंबरकर बुलडाणा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान गुरुवारी पहाटे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे कारागृह प्रशासनाने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला.
गुरुवारी दुपारी न्यायाधीश अमोलकूमार देशपांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, ठाणेदार शिवाजी कांबळे, कारागृह अधीक्षक भामरे, नायब तहसीलदार अमरसिंंह पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक करुणाशिल तायडे, पोलिस उपनिरीक्षक अमित जाधव यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील वैद्यकिय महाविद्यालयास पाठविण्यात आला आहे.