हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उन्हाळ्याच्या आगमनासह लिंबाच्या किंमती बाजारात गगनाला भिडल्या आहेत. सध्या बाजार समितीच्या आवारात लिंबाची आवक 23.3 क्विंटल असून, काही ठिकाणी लिंबाचा भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. हा भाव वाढण्यामागे उन्हाळ्यात वाढलेली मागणी आणि ऑक्टोबरच्या अवकाळी पावसामुळे झालेली उत्पादनातील घट हे मुख्य कारण आहे. तर चला या बातमीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
कारण आणि परिणाम –
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच लिंबाच्या किंमती वाढू लागल्या आहेत. किरकोळ बाजारात एका लिंबाचा भाव पाच रुपये पर्यंत पोहोचला आहे. ही किंमत वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे उन्हाळ्यात लिंबाची वाढलेली मागणी. लोक उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यात लिंबू टाकून पितात. कारण त्याने प्रतिकार शक्ती आणि ऊर्जा मिळते . ऑक्टोबरच्या अवकाळी पावसामुळे लिंबाच्या उत्पादनात घट झाली आहे, ज्यामुळे बाजारातील आवक कमी झाली आहे. त्यामुळे लोकांना आता लिंबू जास्त किमतीने खरेदी करावे लागणार आहेत.
पावसामुळे लिंबाच्या बहराला फटका
“उन्हाळ्यात लिंबाची मागणी वाढते आणि उत्पादनातील घटीमुळे किंमती वाढतात. या वर्षी ऑक्टोबरच्या अवकाळी पावसामुळे लिंबाच्या बहराला फटका बसला, त्यामुळे उत्पादन घटले आहे,” असे एका शेतकर्याने सांगितले. या वर्षी लिंबाच्या किंमती पुढील काळातही वाढत राहण्याची शक्यता आहे.
ग्राहकांना त्याचा फटका –
लिंबाच्या किंमती वाढण्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा होत असला तरी, ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. उन्हाळ्यात लिंबाची मागणी वाढत असल्याने शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे पीक संरक्षण करणे आणि उत्पादन वाढवणे आवश्यक आहे.