1 एप्रिलपासून ‘या’ लोकप्रिय कारच्या किमती वाढल्या; कंपनीने सांगितले यामागील कारण..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| या 1 एप्रिलपासून अनेक वस्तूंच्या किमतींमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामध्ये लोकप्रिय कारचा देखील समावेश आहे. Kia आणि Honda कंपनीने 1 एप्रिलपासून त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच कच्च्या मालाच्या किमतींत झालेली वाढ आणि सप्लाय चेनशी संबंधित समस्यांमुळे कंपनीने कारच्या किमती वाढवण्याचे ठरवले आहे. या निर्णयामुळे कारच्या किमतीत एक टक्क्यांनी वाढ होऊ शकते. तसेच यामुळे कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देखील फटका बसू शकतो.

सध्याच्या काळातील बाजारामध्ये Kia Motors च्या कार धुमाकूळ घालताना दिसत आहेत. अशातच कंपनीने काही निवडक मॉडेलच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. या वाढीव किमती 1 एप्रिलपासून लागू करण्यात आल्या आहेत. भारतीय बाजारात Kia कारच्या किमती 7.99 लाख ते 65.95 लाख रुपयांच्या दरम्यान आहेत. तर Kia च्या लाइनअपमध्ये Sonet, Seltos आणि Carens या कारचा समावेश आहे. या कारच्या किमतींमध्ये जवळपास 3 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

त्याचबरोबर, भारतामध्ये होंडा मोटर्स कंपनी देखील आपल्या कारची चांगली विक्री करताना दिसत आहे. परंतु या कंपनीने देखील आपल्या कारच्या किमती वाढवण्याचे जाहीर केले आहे. परंतु कारच्या किमती किती टक्क्यांपर्यंत वाढवल्या जातील हे कंपनीकडून सांगण्यात आलेले नाही. सध्या बाजारामध्ये होंडाच्या अमेझ, सिटी, सिटी हायब्रिड आणि एलिव्हेट सर्वाधिक आकर्षित ठरत आहेत. यास मॉडेलच्या किमती एप्रिल महिन्यापासून कंपनी वाढवणार आहे. या किमतींबाबत लवकरच कंपनीकडून घोषणाही करण्यात येणार आहे.

दरम्यान, टोयोटा किर्लोस्कर मोटरने गुरूवारी घोषणा केली आहे की, कंपनी 1 एप्रिलपासून आपल्या विशिष्ट मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या किमतीत अंदाजे 1 टक्क्यांनी वाढ केली जाऊ शकते. या किमतींच्या वाढीमध्ये कंपनीने यामागे वाढत्या इनपुट खर्च आणि ऑपरेटिंग खर्चाचे कारण सांगितले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना कोणतेही कार विचारपूर्वक खरेदी करावी लागणार आहे.