पंतप्रधान मोदी ठरले जगातील ‘No.1’ लोकप्रिय नेते! जी-20 मुळे वाढली प्रसिद्धी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात झालेल्या जी-20 परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातील  लोकप्रिय नेते ठरले आहेत. अमेरिकेतील ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान मोदी 76 टक्के रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेते मानले गेले आहेत. यामुळे त्यांनी लोकप्रिय यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर स्विसचे राष्ट्राध्यक्ष अलेन बेरसेट हे आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त लोकप्रिय नेते म्हणून मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे आहेत.

मॉर्निंग कन्सल्टचा सर्वे

गेल्या 6 ते 12 सप्टेंबर दरम्यान अमेरिकन सल्लागार कंपनी ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने सर्वे केला होता. या सर्वेमध्ये असे आढळून आले की, पंतप्रधान मोदी जगभरातील सर्वात जास्त लोकप्रिय नेते आहेत. 76 टक्के लोकांनी लोकप्रिय नेते म्हणून मोदींचे नाव घेतले आहे. तर 18 टक्के लोकांनी मोदींना ना पसंती दाखवली आहे. मोदीनंतर सर्वात जास्त लोकप्रियता अलेन बेरसेट आणि मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांना मिळाली आहे. यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक 15 व्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे 17 व्या क्रमांकावर आहेत.

ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये अव्वल स्थानावर नरेंद्र मोदी आहेत. त्याचबरोबर, चौथ्या क्रमांकावर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला आहेत. पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बिओनीज आहेत. तसेच, सहाव्या इटलीचे पंतप्रधान मेलोनी जॉर्जिया हे आहेत. मार्च महिन्यानंतर करण्यात आलेले हे सर्वात मोठे अप्रूव्हल रेटिंग आहे. या सर्वेमुळे भारताचे पंतप्रधान लोकांमध्ये किती प्रसिद्ध आहेत हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, भारतात नुकतीच जी 20 परिषद पार पडली आहे. या परिषदेसाठी वेगवेगळया देशातील नेते भारतात आले होते. या परिषदेनंतरच इतर देशांमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव चर्चेत आले आहे. तर लोकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासाठीची लोकप्रियता वाढली आहे. यामुळेच आता ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये मोदींना अव्वल स्थान पटकावले आहे. मॉर्निंग कन्सल्ट’ने या संबंधित सर्वे 6 ते 12 सप्टेंबर दरम्यान गोळा केला होता. या सर्वमधून फक्त 18 टक्केच लोकांनी नरेंद्र मोदी यांना ना पसंती दाखवल्याचे समोर आले आहे.