पंतप्रधान मोदी साईबाबांच्या चरणी नतमस्तक; एकनाथ शिंदेंसह फडणवीसांची उपस्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राज्यातील विविध भागात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. थोड्या वेळापूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेतले आहे. तसेच, त्यांनी साईबाबांची पाद्यपूजा करत आरती केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. त्यामुळे थोड्या वेळासाठी दर्शन रांग बंद ठेवण्यात आली होती.

आजबरोबर पावणेदोनच्या आसपास नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल झाले होते. यानिमित्ताने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. त्यानंतर साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी नरेंद्र मोदी साई मंदिरात दाखल झाले. पुढे, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साईबाबांची आरती करण्यात आली. यानंतर नरेंद्र मोदी साईबाबांच्या चरणी नतमस्तक झालेले पाहायला मिळाले. या थोड्या वेळासाठी मंदिरातील दर्शन रांग बंद करण्यात आली होती. तसेच, मंदिराच्या आवारात पोलिसांचा कडक बंदोबस्त राबवण्यात आला होता.

दरम्यान, आता नरेंद्र मोदी हे शिर्डी आणि अकोल्यातील विविध कार्यक्रमांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी रवाना झाले आहे. त्यांच्या हस्ते थोड्या वेळातच निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे आज शिर्डी आणि अकोल्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, नरेंद्र मोदींच्या सुरक्षितेसाठी सर्व पातळीवर उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.