Tuesday, June 6, 2023

नरेंद्र मोदी पोहचले आईच्या भेटीला; रुग्णालयाबाहेर हात जोडत केला नमस्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांना स्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच अहमदाबाद येथे रुग्णालयात जाऊन आईची भेट घेतली. यावेळी रुग्णालयाबाहेर येताच त्यांनी गाडीतून उपस्थितांना हात जोडून नमस्कारही केला.

नरेंद्र मोदी यांच्या आईनं रात्री स्वसनाचा त्रास जाणवू लागलेणे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हीराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची तब्बेत स्थिर असल्याची माहिती रुग्नालयाकडून तत्काळ पंतप्रधान मोदींना देण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी रुग्णालयात जाऊन आईची भेट घेतली.

हीराबेन यांचा जन्म 18 जून 1923रोजी झाला. याच वर्षी त्यांनी वयाच्या 100 व्या वर्षात प्रवेश केला. 5 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान केलं आहे. गांधीनगर जवळील रायसन गावात त्यांनी मतदान केले. त्यापूर्वी 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आईची भेट घेऊन आशीर्वाददेखील घेतले होते. जून महिन्यात हीराबेन यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आठवणी जाग्या करणारा भावनिक ब्लॉग लिहिला आहे.