आता कैद्यांनाही मिळणार काम – फ्लिपकार्ट, स्वीगी, कॅर्वी, HDFC यांचा अनोखा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तेलंगणा | शिक्षा पूर्ण झालेल्या कैद्यांना कामाला घेण्यासाठी स्वीगी, फ्लिपकार्ट, कॅर्वी आणि HDFC यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. खून, चोरी अशा गुन्ह्यांत अडकलेले गुन्हेगार आता या कंपनीकडे काम करणार आहेत. डिलिव्हरी बॉय, मार्केटिंग एक्सिक्युटिव्ह, संगणक चालक, वैद्यकीय कामगार, सुरक्षा रक्षक अशा विविध स्वरूपाची कामे त्यांना देण्यात आली आहेत. २३० कैद्यांनी या प्रक्रियेसाठी मुलाखती दिल्या होत्या. यातील १५५ जणांना काम करण्याची संधी मिळाली. ८०००/- ते १८,०००/- असा पगार या कैद्यांना दिला जाणार आहे.

Leave a Comment