कट्टर विरोधक पृथ्वीराज बाबा अन् उंडाळकर काका पहिल्यांदाच येणार एका व्यासपिठावर

Prithviraj chavan and vilasrao Undalka
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे कट्टर विरोधक विरोध संपवून पहिल्यांदाच शुक्रवारी एका व्यासपीठावर येणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी तीन वाजहा हा मेळावा होईल, अशी माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कराड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, इंद्रजीत चव्हाण, शिवराज मोरे, आप्पासाहेब माने, नगरसेवक राजेंद्र यादव आदी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात हे शुक्रवारी येत आहेत. कराड येथील पंकज हॉटेल येथे मेळावा होणार आहे. माजी मुख्यमंत्री चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, अॅड. उदयसिंह पाटील, गृहराज्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे संपर्क मंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत मेळावा होईल. कोरोनामुळे काही मोजक्याच महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’