कराडमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन : पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड येथे 25 नोव्हेंबर रोजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते कराड येथील प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण, शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटनासह व कृष्णा नदीवरील रेठरे व पाचवडेश्वर-कोडोली नवीन पुलाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण मध्ये विविध विकास कामे झाली आहेत. मुख्यमंत्री असतानाच्या काळात व त्यानंतरही या विकास कामांची कार्यवाही व इतर कामे सुरू आहेत. आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरात भव्य प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालय बांधण्यात आले. या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा तसेच नवीन विश्रामगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच रेठरे येथिल नवीन पुलाचे भूमिपूजन व पाचवडेश्वर कोडोली दरम्यान होणाऱ्या नवीन पुलाचे भूमिपूजन ही मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त समाधी स्थळावर श्रद्धांजली कार्यक्रम तसेच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महत्वाच्या चार विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.