महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला ‘हा’ उपाय; म्हणाले, शहांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना आता…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सीमावादावर चर्चा होऊनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आपल्या निर्णयावर ठाम आहेत. काल कर्नाटकच्या अधिवेशनात त्यांनी सीमांदावर ठराव मांडण्याबाबत एक वक्तव्य केले. त्यावर काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रीय मंत्री शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्रित एका खोलीत बंद करावं, सीमावाद सुटेपर्यंत बाहेर काढलं नाही तर वाद थांबेल, असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी आज नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज परिस्थिती अशी आहे की केंद्रात कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये एकाच विचारांच सरकार आहे. त्याच्या मनात असेल त्याच्या इच्छा असेल तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी दोन्हीही मुख्यमंत्र्याना परत बोलवावे. आणि त्यांना समोरासमोर खोलीत बसवून तुम्ही जो पर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत बाहेर येऊ नका, असे सांगितले तर अशा पद्धतीने प्रश्न सोडवता येईल.

आम्हीही विरोधकांनी भूमिका घेतली आहे कि महाराष्ट्र सरकार जो निर्णय घेईल तडजोडीने सुटला तरी तो आम्हाला मान्य आहे. शेवटी ते महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील अशी आम्हाला खात्री आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नामध्ये आम्ही राज्य सरकारच्या बरोबर आहोत, परंतु राज्य सरकारने बोटचेपी भूमिका घेऊ नये, असा इशाराही यावेळी चव्हाण याणी दिला आहे.