पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पाचवडच्या प्रस्तावित पूलाच्या कामाची पाहण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने ४५ कोटींचा निधी मंजूर झालेल्या कराड तालुक्यातील पाचवडेश्वर येथील कृष्णा नदीवरील प्रस्तावित पूलाच्या कामाची पाहणी आ. चव्हाण यांनी गुरुवारी केली. हा पूल दोन खोऱ्यांना जोडणारा दुवा ठरेल. यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग आणि कराड-तासगाव महामार्गाही एकमेकांना जोडला जावून या परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असे मत आ. चव्हाण यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

याप्रसंगी जि. प. सदस्य ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, य. मो. कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. इंद्रजीत मोहिते, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे कराड शहराध्यक्ष राजेंद्र माने, मलकापूर शहराध्यक्ष राजेंद्र यादव, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, राहुल चव्हाण, झाकीर पठाण आदींसह बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार उपस्थित होते.

यावेळी पाचवड ते कोडोली दरम्यान कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पूलासाठी पाण्यात पिलर उभा करण्यासाठी धर असल्याची चाचणी घेणाऱ्या बोअर यंत्रणेच्या कामाचा श्रीफळ फोडून आ. चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ झाला. प्रस्तावित पूलाचा आराखडा व नदीपात्राची संबंधित ठिकाणची पाहणी आ. चव्हाण यांनी केली. अधिकाऱ्यांना त्यांनी काही सुचनाही केल्या.

आ. चव्हाण म्हणाले, कृष्णा नदीवर होणाऱ्या या पूलासाठी ४५ कोटींचा निधी मंजूर आहे. या पूलामुळे पुणे-बंगलोर आणि कराड-तासगाव हे दोन्ही महामार्ग जोडले जातील. दोन खोऱ्यांना जोडणाऱ्या या पूलामुळे कराड, मलकापूर शहरातील वाहतुक, दळणवळणाचा भार कमी होणार असून पाचवड, कोडोली, दुशेरे, शेरे, कार्वे वगैरे गावांच्या विकासाला, शहरीकरणाला चालना मिळणार आहे. प्रत्येकी ४० मीटर अंतराचे ८ पिलरवर पूल उभा केला जाणार आहे. त्यावरील रस्ता सहापदरी असणार आहे. दोन्ही बाजूच्या रस्त्याचे कामही पूर्ण होणार आहे. लवकरच टेंडर निघेल. त्यानंतर भव्य स्वरुपात भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला जाईल.

Leave a Comment