मनोहर भिडे हा बोगस माणूस; पावसाळी अधिवेशनात पृथ्वीराज चव्हाण आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे ज्येष्ठ नेत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना शनिवारी मध्यरात्री ईमेलवर द्वारे नांदेड येथील संशयित अंकुश शंकरराव सवराते याने धमकी दिली होती. त्यांच्याप्रमाणे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना देखील धमकी देण्यात आली. याचे पडसाद आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. मनोहर भिडे यांच्यावर कारवाई करून अटक करावी, अशी मागणी विरोधकांनी केली तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात धमकीच्या घटनेची माहिती देत भिडेंवर निशाणा साधला. भिडे हा फ्रॉड, बोगस माणूस आहे. हा माणूस सोनं गोळा करत आहे. त्याच्याकडून एन परीक्षेच्या काळात गडकोट मोहिमा काढल्या जातात. त्याला बहुजन समाजातील मुले जातात आणि शिक्षणापासून भरकटतात, असे म्हणत भिडेंवर कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिवेशनात केली.

राज्याच्या पावसाळी अधिवेशाचा शेवटचा आठवडा असल्याने आज बुधवारी अधिवेशनाच्या कामकाजावेळी काँग्रेस नेत्यांनी भिडेंवर कारवाई करून अटक करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. यावेळी सुरुवातीला काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी त्यांना ट्विटरवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा मुद्दा सभागृहात मांडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी यशोमती ठाकूर यांची सुरक्षा वाढवण्याचे आश्वासन दिले तसेच धमकी देणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

त्यांच्यानंतर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी यशोमती ठाकूर यांच्यापूर्वी नांदेडहून एका व्यक्तीकडून ईमेलद्वारे धमकी देण्यात आल्याची माहिती सभागृहास दिली. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, यशोमती ठाकूर, मला आणि जितेंद्र आव्हाड यांना धमकी मिळालाय. कुठून तरी तो सूत्रधार धमकी देण्याकरिता प्रवृत्त केल्याशिवाय होणार नाही. सूत्रधार कोण आहार आपण कारवाई करत आहात हि माहिती दिली हि चांगली गोष्ट आहे. परंतु अध्यक्ष महोदय हा एक फ्रॉड माणूस आहे. याची डिग्री काय आहे? कुठे शिक्षण घेतलंय? हा प्राध्यापक कुठे होता? सर्वात महत्वाची बाब हा माणूस सोनं गोळा करतोय. आपल्या कायद्याप्रमाणे जर कुठल्याही संस्थेनी जर कहाणी वर्गणी गोळा करायची असेल तर त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे संस्था रजिस्टर करावी लागते. त्याला हिशोब द्यावा लागतो. हा माणूस कितीतरी टनाने सोनं गोळा करणारा माणूस आहे. एक ग्रॅम सोनं लोकांकडून गोळा करतोय. एन परीक्षेच्या वेळेला हा काही तरी गड किल्ल्याची मोहीम काढतोय. आणि हि बहुजन समाजातील मुलं कुठं तरी फरफट जावी हा मुख्य उद्देश आहे. आम्हाला धमक्या येतात. समाजात काम करताना असे प्रकार घडतात त्याला आम्ही भीक घालत नसल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले.

समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या कंपन्यांच्या अनुभवाची तपासणी करा : पृथ्वीराज चव्हाण

यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिवेशनात समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या कंपन्यांच्या अनुभवाची तपासणी करावि अशीही मागणी केली. ते म्हणाले की, समृद्धी महामार्गावर गर्डर क्रेनमुळे झालेल्या अपघातात तब्बल विस जणांचा मृत्यू झाला. यासाठी जबाबदार असलेल्या संबंधीत ठेकेदार कंपण्यांवर कारवाई करावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या मार्गावर पुरेशा सोयी उपलब्ध होईपर्यंत किमान चार पाच महिने हा महामार्ग बंद ठेवावा अशी मागणीही त्यांनी केली. या काळात आवश्यक त्या सोयी करून हा महामार्ग सूरू केल्यास अनेकांचे जीव वाचतील.

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

सभागृहात माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संभाजी भिडे यांनी अमरावती इथं एक भाषण केलं, त्यात त्यांनी आपल्या सहकाऱ्याला पुस्तक वाचायला लावले. त्यातील आशयावरून त्यांनी काही कमेंट केल्या आहेत.तीन दोन पुस्तके डॉक्टर एसके नारायणाचार्य आणि घोष यांची आहेत. ते काँग्रेसचे नेते असल्याचं म्हणणं आहे. त्यांच्या पुस्तकातील मजकूर संभाजी भिडे यंनी वाचला. अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी भिडे गुरूजी म्हणल्याने गोंधळ सुरू झाला. तेव्हा त्यांचे नाव गुरुजी आहे, आम्हाला गुरुजी वाटतात. संभाजी भिडे यांनी CRPC 41 अ ची नोटीस पाठवलीय, अमरावती पोलिसांनी संपर्क साधून नोटीस बजावलीय. ती स्वीकारली आहे. त्यानुसार चौकशी होईल. अमरावती येथील सभेचे व्हिडीओ उपलब्ध नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. माध्यमात फिरणारे व्हिडीओ वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. त्यामुळे त्यांचे आवाजाचे नमुने घेण्यात येतील, असे फडणवीस यांनी म्हंटले.