Thursday, March 30, 2023

नाशिकमध्ये खाजगी बसला आग; 10 ते 12 जणांचा होरपळून मृत्यू

- Advertisement -

 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकमध्ये खासगी बसचा भीषण अपघात झाल्यानंतर बसला आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत तब्बल 10 ते 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनस्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झालं असून अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

नाशिकच्या मिरची हॉटेलजवळ या बसचा अपघात घडला. धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेलरची धडक झाल्यानंतर बसने पेट घेतला. यामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 38 जण जखमी झाले असनू जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या बसने पेट घेतल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आलं त्यांनी उड्या मारल्या तर आतमध्ये अडकलेले प्रवासी आगीत होरपळून मरण पावले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.