औरंगाबाद | गेल्या 14 महिन्यांपासून शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. खाजगी शिक्षण संस्था व खाजगी कोचिंग क्लासेस यांचे आर्थिक नुकसान या 14 महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेले आहे.
याच विषयाला अनुसरून हॅलो महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी औरंगाबाद येथील खाजगी कोचिंग क्लासेस चालकानंसोबत संवाद साधला असता. त्यांनी सांगितले की, गेल्या चौदा महिन्यांपासून कोचिंग क्लासेस बंद असल्या कारणाने आमचे आर्थिक नुकसान होत असून. या विषयावर आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेयशिक्षण मंत्री व 24 जिल्ह्यांचे जिल्हाअधिकारी यांना निवेदनही दिली. त्यावर अद्यापही राज्य सरकारने कुठलीही दखल घेतलेली नाही.
खाजगी कोचिंग क्लासेस चालकांच्या या आर्थिक नुकसान यामुळे त्यांना स्वतःचे घर चालवणे ही कठीण झालेले आहे. त्यांनी अनेक वेळा निवेदनही देऊन सरकारने त्याची दखल घेतली नाही. चौदा महिन्यांपासून आर्थिक नुकसान होत असता नाही क्लासेसचे भाडे, लाईट बिल आणि जीएसटी सुरूच आहे. त्यावर ही सरकार कुठलाच निर्णय घेत नसल्याने खाजगी कोचिंग क्लासेस चालक निराश आहेत. महाराष्ट्र कोचिंग क्लासेस असोसिएशनचे सरचिटणीस ज्ञानेश्वर ढाकणे यांनी हॅलो महाराष्ट्र सोबत बोलताना ही माहिती दिली