6 चेंडूत 6 सिक्स, संघाच्या 300 पार धावा; दिल्ली प्रीमिअर लीगमध्ये धुमाकूळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली प्रीमियर लीगमध्य (Delhi Premier League) आज दक्षिण दिल्ली सुपरस्टार विरुद्ध उत्तर दिल्ली स्ट्रायकर्स सामन्यात अनेक मोठमोठे इतिहास रचले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण दिल्ली सुपरस्टारने २० ओव्हर मध्ये 308 धावांचा डोंगर उभारला आहे. सलामीवीर प्रियांश आर्य आणि आयुष बडोनी यांनी शानदार शतके झळकावली. यावेळी प्रियांश आर्यने (priyansh arya 6 sixes) ६ चेंडूत ६ षटकार ठोकत नवा विश्वविक्रम केला आहे. फिरकीपटू मनन भारद्वाजच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत हा कारनामा केला.

आजच्या सामन्यात दक्षिण दिल्ली सुपरस्टारने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर सार्थक रॉय स्वस्तात बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या आयुष्य बडोनीच्या साथीने प्रियांश आर्यने संघाचा धावफलक हलता ठेवला. प्रियांश आर्यने अवघ्या ५० चेंडूत १२० धावांची विक्रमी केली केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि १० गगनचुंबी षटकार ठोकले. डावाच्या 12 व्या षटकात त्याने फिरकीपटू मनन भारद्वाजच्या गोलंदाजीवर सलग ६ चेंडूत ६ षटकार मारले. आश्चर्याची बाब म्हणजे डावखुऱ्या मनन भारद्वाजने काही चेंडू उजव्या हाताने टाकले, तरीही त्याला आपली धुलाई रोखता आली नाही. या लीगमधील प्रियांशचे हे दुसरे शतक आहे.

दुसरीकडे, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आयुष बडोनीनेही तुफानी फलंदाजी करत फक्त 55 चेंडूंत 165 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली. या खेळी दरम्यान त्याने आठ चौकार आणि 19 षटकार ठोकले. आयुष बडोनी आणि प्रियांश आर्यच्या शतकांच्या जोरावर दक्षिण दिल्ली सुपरस्टारने 20 षटकांत 4 गडी गमावून 308 धावा केल्या. या लीगमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. याआधी कोणत्याही संघाने 300 चा टप्पा ओलांडला नव्हता. प्रत्युत्तरात उत्तर दिल्ली स्ट्रायकर्सने सध्या ७ षटकात ३ बाद ५१ धावा केल्या आहेत. उत्तर दिल्लीसाठी आजच्या सामन्यातील विजय खूपच दूर आहे.