Credit Card UPI शी लिंक कसे करावे? या सोप्या टिप्स पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजकाल आपण आपण बहुतेक वस्तू EMI वर विकत घेऊ लागलो आहे. ज्यामुळे कमी पैशांत आपण आपल्याला हवी असलेली वस्तू विकत घेणे सोपे जाते. त्यासाठी बँका आपल्या ग्राहकाला credit card उपलब्ध करून देत आहेत. पण हे credit card सध्या सर्वत्र प्रचलित असलेल्या UPI ॲप शी कसे कनेक्ट केल्यास त्याचा वापर कसा करायच हे समजून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती समजून घेऊ.

UPI क्रेडिट कार्डला लिंक करण्यासाठी, तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड UPI अँपशी लिंक करावे लागेल. युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI पेमेंट्स हा आजकाल डिजिटल व्यवहाराचा सर्वात सोपा मार्ग आहे. याद्वारे कोणतीही व्यक्ती सहजपणे कुठेही पेमेंट करू शकते. हा पेमेंट मोड डिजिटायझेशनला चालना देण्यासाठी खूप मदत करतो. या मोडमध्ये आपण काही सेकंदात पैसे एखाद्याचा बँक खात्यात ट्रान्सफर करू शकतो. आतापर्यंत लोक फक्त डेबिट कार्डद्वारे UPI पेमेंट करत होते . पण काही क्रेडिट कार्ड निवडक UPI-अँप जसे की BHIM, Paytm, PhonePe द्वारे संलग्न करुन वापरले जाऊ शकते.

कोणत्या बँकेच्या क्रेडिट कार्डने तुम्ही UPI पेमेंट करू शकता?

एक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि कॅनरा बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना ही सुविधा मिळाली आहे. या बँकांचे कार्डधारक त्यांचे कार्ड UPI अँप्सशी लिंक करू शकतात. त्यानंतर ते क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकतील.त्यासाठी खाली दिलेल्या महत्वपूर्ण टप्प्यांचा वापर करा

1. सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या BHIM, PhonePe, Paytm, Mobikwik सारखे डिजिटल पेमेंट अँप डाउनलोड करावे लागेल.
2. यानंतर, तुम्हाला या अँपमध्ये तुमच्या credit card चा तपशील टाकून लॉग-इन करावे लागेल, म्हणजेच तुम्हाला या अँपमध्ये नोंदणी करावी लागेल. या अँपमध्ये कोणतेही नोंदणी शुल्क किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे शुल्क लागत नाही.
3. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी तुमची बँक निवडावी लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइलवरून लिंक केलेले क्रेडिट कार्ड निवडावे लागेल जे तुम्हाला UPI पेमेंटशी लिंक करायचे आहे.
4. यानंतर तुम्हाला UPI पिन जनरेट करावा लागेल. तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड निवडावे लागेल.
5. त्यानंतर तुम्ही तुमचा UPI पिन सेट करण्याचा पर्याय निवडाल, त्यानंतर तुम्ही तुमच्या कार्डचे शेवटचे 6 अंक आणि त्याची एक्सपायरी तारीख टाकाल.

अश्या प्रकारे तुम्ही तुमचे CREDIT CARD आपल्या अकाउंटशी जोडू शकता.