Property Buying Tips | कमी पैशात घर खरेदी करायचंय? मग या टिप्स फॉलो कराच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Property Buying Tips आपल्या आयुष्यात आपलं एक स्वतःच असं घर असावं. अशी अनेक सर्वसामान्य लोकांची इच्छा असते. यासाठी सगळेच जण काही ना काही गुंतवणूक करून ठेवत असतात. घर घेतल्यावरही त्याचा ईएमआय अनेक वर्ष भरावा लागतो. घर आणि मालमत्ता खरेदी करताना अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून खर्चाचा भार अधिक पडणार नाही. आणि मोठ्या प्रमाणात तुमची बचत देखील होईल. तुम्हाला जर तुमचे स्वतःचे घर किंवा एखादी मालमत्ता खरेदी करायची असेल, तर त्यासाठी आज आम्ही तुम्हाला खूप महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत. (Property Buying Tips)

तुम्हाला तुमचे घर आणि मालमत्ता खरेदी (Property Buying Tips) करताना खर्चाचा भार कमी करायचा असेल, तर सगळ्यात आधी तुमच्या बजेटनुसार घर घ्या. आजच्या काळात घराच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे तुमचे बजेट तयार करा आणि त्यानुसार घर घ्या. तुमच्या बजेटपेक्षा जास्त किमतीचे घर घेतले, तर त्यामुळे तुमच्यावर आणखी आर्थिक भार वाढेल

तुम्ही जर एजंटमार्फत घर खरेदी केले, तर त्या व्यक्तीला एक ते दीड टक्के कमिशन द्यावे लागते. त्याचप्रमाणे काही एजंट असे असतात, जे खरेदी विक्रेत्यांकडून कमिशन घेतात. त्यामुळे घर घेणाऱ्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या 2.5 ते 3 टक्के कमिशन द्यावे लागते. परंतु तुमच्यामध्ये जर एजंट नसेल तर तुमचे कमिशन वाचते.

जर तुम्हाला घर विकत घ्यायचे असेल, तर सगळ्यात आधी तुमचे जवळचे मित्र मैत्रिणी आणि शेजारी यांच्याशी बोला. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून उपलब्ध असणाऱ्या घरांची माहिती मिळवा. तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला परवडणारे घर बघा आणि थेट घर मालकाशी संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला एजंटला कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाही.

तुम्ही जर एकाच प्रकल्पात दोन ते तीन ग्राहकांनी घर घेतले. तर विकासासाठी तुम्हाला सवलत देखील देऊ शकते. त्याचप्रमाणे डेव्हलपर आणि विक्रेते सणासुदीच्या काळात घर खरेदीवर आणि ही चांगले ऑफर्स देत असतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा देखील फायदा घेऊ शकता.

प्रॉपर्टीचा करार करण्यापूर्वी त्या भागातील लोकांना भेटा. आणि सगळ्या दरांची माहिती घ्या. त्यानंतरच निर्णय घ्या. तुम्ही जर एक रकमे पैसे देऊन घर घेण्याचा विचार केला, तर तुम्हाला जास्त सवलत मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त रोख पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला अधिक सूट मिळेल. तयार घरे बांधकामाधीन घरांपेक्षा अधिक महाग असतात. तसेच बांधकामाधीन घरांसाठी जास्त सवलत देखील मिळवू शकता.