औरंगाबाद | औरंगाबादची कन्या आणि विविध धाडसी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होणाऱ्या आकांक्षा धनंजय तम्मेवार हिने सर्वात कमी वयात खार्दुंगला 563 अतिशय अवघड मोटरेबल पास 500 सीसी रॉयल इन्फिल्ड बुलेट मोटर सायकलवर पार करण्याचा विक्रम नुकताच पूर्ण केला. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली असून तसे प्रमाणपत्र तिला नुकतेच प्राप्त झाले आहे. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी सर्वात कमी वयात तिने केलेल्या या विक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ही करण्यात आली आहे.
3 जून 2021 ला औरंगाबाद वरून निघाली व श्रीनगर येथे पोचली. 6 जूनला तिने तिचा बाईक प्रवास सोनममर्गपासून सुरु केला. द्रास, कारगिल, सुमेर, नुब्रा, पेंगोंग, सर्चू, जिस्पा, अटल, टनल, रोहतांग असा प्रवास करत ती शेवटी मनालीला पोहोचली. वाटेत बऱ्याच बर्फाच्छादित आणि उंचावरील रस्त्यावरुन तिला जावे लागले. जगातील सर्वात उंचावरील प्रथम क्रमांकाचे खार्दुंगला पास द्वितीय क्रमांकाचे चांगला पास आणि तृतीय क्रमांकाचे तांगलांगला पास पार करीत आकांक्षा ही सर्वात कमी वयाची मोटर सायकल रायडर ठरली आहे. या सोबतच सर केलेल्या तिन्ही पाससाठी तिचा विक्रम नोंदविला गेला आहे.
जगातील सर्वात कमी वयाची फीमेल बाईक रायडरच्या रूपात तिने खार्दुंगला पास पार करण्याचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केला. त्याबरोबरच गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये हि तिच्या नावे या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. जगातील सर्वोच्च तिनी मोटारेबल पास पार करण्याचा विक्रम तिने वयाच्या 19 वर्ष 18 दिवसात पूर्ण केला आहे. यासाठी तिला औरंगाबाद जिल्ह्यातील राजकीय नेते आणि सर्व नागरिकांमधून शुभेच्छा दिल्या जात आहेत. केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार इम्तियाज जलील तसेच यांनीही विशेष शुभेच्छा दिल्या.