अभिमानास्पद! औरंगाबादचे मेजर साकेत पाठक यांना सेना मेडल जाहीर

0
100
Pathak Saket
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | औरंगाबादचे सुपुत्र मेजर साकेत प्रकाश पाठक यांना त्यांनी लष्करात बजाविलेल्या अतुलनीय सेवेबद्दल सेना मेडल जाहीर झाले आहे. पुलवामा येथे आठ एप्रिल 2021 मध्ये अतिरेक्यांसोबत झालेल्या कारवाईदरम्यान त्याने दाखविलेल्या शौर्याची नोंद घेत भारतीय लष्करातर्फे हे मेडल लवकरच त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

मेजर साकेत हा औरंगाबादच्या सिडको भागातील रहिवासी प्रकाश आणि ज्योती पाठक यांचा पुत्र आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुकुल मंदिर आणि कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. बालपणापासूनच हुशार असलेल्या मेजर साकेत याने सिंकदराबाद येथील लष्कराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डेहराडून येथील इंडीयन मिल्ट्री अॕकॕडमीत आपले लष्करी अधिकारीपदाचे प्रशिक्षण घेतले. सन 2014 साली लष्करात रुजू झाल्यानंतर जम्मू काश्मीर आणि पंजाबात विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजाविली. सियाचीन येथे ते कार्यरत होते. सध्या मेजर साकेत 44 आरआर बटालियनमध्ये आहेत. एप्रिल महिन्यात अतिरेक्यांसोबात झालेल्या चकमकीत ते जखमी झाले होते. परंतु प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी त्यावर मात केली अशी माहिती साकेत यांचे वडील प्रकाश पाठक यांनी दिली.

लष्कराने स्वातंत्र्य दिनी जाहीर केलेल्या या पदकाबद्दल त्यांची आई ज्योती पाठक यांनी आनंद व्यक्त केला. आपण लष्करात करीअर करावे अशी साकेतची बालपणापासूनची इच्छा होती. तो करीत असलेल्या देशसेवेचा आम्हाला आभिमान आहे असे त्यांनी सांगितले. साकेत हा परभणी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंतराव पाठक आणि प्रभावती पाठक यांचा नातू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here