सरकारची जबरदस्त योजना!! फक्त १०० रुपये गुंतवल्यास होईल 10 लाख रुपयांचा नफा

0
20
PPF
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजच्या काळात प्रत्येकजण आपल्या भविष्याच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी विविध योजनेत गुंतवणूक करत असते. त्यामूळेच सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) योजना आताच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. या योजनेमध्ये सुरक्षिततेची हमी, चांगला परतावा आणि करसवलतीचे फायदे मिळत आहे. परिणामी पीपीएफ गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.

पीपीएफ म्हणजे काय?

पीपीएफ ही केंद्र सरकारच्या हमी असलेली दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास ७.१% दराने व्याज मिळते आणि यात मिळणारे चक्रवाढ व्याज गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळवून देते. विशेष म्हणजे, या योजनेतील गुंतवणूक आयकर कलम ८० सी अंतर्गत करमुक्त आहे.

रोज १०० रुपये गुंतवून १० लाखांचा फायदा

जर तुम्ही रोज फक्त १०० रुपये या योजनेत गुंतवले, तर १५ वर्षांच्या कालावधीत तुम्हाला जवळपास १० लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही महिन्याला ३,००० रुपये (वर्षाला ३६,००० रुपये) गुंतवले, तर १५ वर्षांनंतर तुम्हाला एकूण ९,७६,३७० रुपये मिळतील. त्यामध्ये ५.४० लाख रुपये तुमची मूळ गुंतवणूक असेल, तर ४.३६ लाख रुपये केवळ व्याज स्वरूपात मिळतील.

महत्वाचे म्हणजे, पीपीएफची मॅच्युरिटी १५ वर्षांची असते, परंतु इच्छित असल्यास गुंतवणूकदार हा कालावधी पुढे वाढवू शकतात. जर मॅच्युरिटीच्या १५ वर्षांनंतर आणखी ५ वर्षांसाठी गुंतवणूक सुरू ठेवली, तर परतावा जवळपास दुप्पट होतो. उदाहरणार्थ, जर २० वर्षांसाठी गुंतवणूक केली, तर एकूण ७.२० लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ८.७७ लाख रुपये व्याज मिळू शकते, आणि एकूण परतावा १५.९७ लाख रुपये होईल.

पीपीएफच्या गुंतवणुकीचे फायदे

  1. सुरक्षितता आणि हमी – सरकारच्या हमीमुळे या योजनेत पैसे बुडण्याचा धोका नाही.
  2. चक्रवाढ व्याजाचा फायदा – व्याजावर व्याज मिळत असल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीत मोठा परतावा मिळतो.
  3. करसवलत – गुंतवणूक, मिळणारे व्याज आणि अंतिम रक्कम या सर्वांवर कर सवलत उपलब्ध आहे.
  4. लवचिकता – किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये दरवर्षी गुंतवू शकता.