Pune Accident : पुण्यात भीषण अपघात!! दादा गटातील आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोर्शे कार अपघातानंतर पुण्यात आणखी एक भीषण अपघाताची (Pune Accident) घटना समोर आली आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यात एका कारचालकाने दुचाकीवरील दोघांना चिरडलं आहे. यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. सदर कार चालक हा अजित दादा गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांचा पुतण्या असल्याची माहिती समोर येत आहे. मयुर मोहिते (Mayur Mohite) असं आमदार पुतण्याचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी रात्री उशीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मयुर मोहिते कार विरुद्ध दिशेने चालवत होता– (Pune Accident)

आंबेगाव तालुक्यातील एकालहरे गावाजवळ ही अपघाताची घटना घडली. प्रथमिक माहितीनुसार मयुर मोहिते कार विरुद्ध दिशेने चालवत होता. मयुर मोहितेच्या कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिली. हा अपघात (Pune Accident) इतका भीषण होता, की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ओम सुनिल भालेराव असे अपघातात मृत्यू झालेल्याचं नाव आहे. याबाबत मंचर पोलीस स्टेशनमध्ये नितीन रामचंद्र भालेराव यांनी फिर्याद दिली असून मंचर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या ठिकाणी आता सीसीटीव्ही उपलब्ध आहे का पोलीस याची चाचपणी करत आहे.

दरम्यान, पुणे पोर्शे अपघातानंतर झालेल्या पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातात आणखी एका आमदाराचं कनेक्शन समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पुणे पोर्शे अपघातात आमदार सुनील टिंगरे यांचं नाव समोर आलं होतं. आता रविवारी झालेल्या पुणे-नाशिक अपघातात आमदार दिलीप मोहिते पाटलांचं नाव समोर आलं आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत.