Pune Airlines : पुणेकरांना खुषखबर!! या 2 देशांसाठी थेट विमानसेवा सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शिक्षणाचे माहेरघर आणि नोकरीचे मुख्य स्थान असलेल्या पुण्यातुन आता नवीन दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा (Pune Airlines) सुरु होणार आहेत. पुणे ते दुबई आणि पुणे ते बँकॉक अशा या दोन्ही विमानसेवा आहेत. हि दोन्ही विमाने इंडिगो कंपनीची असतील. यातील पुणे-दुबई- पुणे हि विमानसेवा रोज सुरु असेल तर पुणे- बँकॉक- पुणे विमानसेवा आठवड्यातून ३ दिवस सुरु राहील. येत्या 27 ऑक्टोबरपासून या दोन्ही विमानसेवा सुरु होतीलपुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी यासंदर्भातील माहिती एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून दिली आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत म्हंटल, पुणेकरांसाठी ‘गुड न्यूज’… पुण्याहून दोन नवी आंतरराष्ट्रीय उड्डाणे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे (Pune Airlines) येत्या २७ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होत असून यात पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बँकॉक-पुणे या मार्गांचा समावेश आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा निश्चितच फायदा होणार आहे”, असं मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे. मुरलीधर मोहोळ यांनी सणासुदीच्या काळात एकप्रकारे पुणेकरांना खुशखबरच दिली असं म्हंटल पाहिजे.

प्रवाशांना मोठा दिलासा – Pune Airlines

पुणे आणि दुबई यांच्यातील थेट विमानसेवेमुळे दोन्ही शहरांमधील ‘अंतर’ कमी होईल आणि आर्थिक प्रगतीचे नवे आयाम खुले होतील, तसेच बँकॉकसारखी पर्यटन केंद्रेही थेट पुण्याशी जोडली जातील. सध्या पुणे विमानतळावरून स्पाइसजेटद्वारे संचालित दुबई आणि विस्तारा द्वारे संचालित सिंगापूर अशी २ आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु आहेत. सिंगापूर साठीची फ्लाइट डिसेंबर २०२३ पासून सुरु झाली आहे, तर दुबईची फ्लाइट आता वर्षानुवर्षे सुरू आहे. परंतु , अलीकडे, स्पाइसजेटच्या आर्थिक परिस्थितीला या विमानाचा फटका बसला आहे आणि त्यामुळे वारंवार विलंब होत आहे आणि त्यामुळे अनेक प्रवाशांना स्पाईसजेट वर अवलंबून न राहता दुबईला जाण्यासाठी मुंबईला जाण्यास भाग पाडले जात आहे. मात्र आता इंडिगोचे विमान पुण्याहून थेट दुबईला जाणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.