Pune Airport : पुण्यातून थेट युरोपसाठी उड्डाण होणार; मुरलीधर मोहोळ यांची घोषणा

Pune Airport To Europe
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Airport। येत्या काळात लवकरच पुण्यातून थेट युरोपसाठी उड्डाण सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (murlidhar Mohol) यांनी दिली आहे. शहराच्या हवाई वाहतूक पायाभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी ही घोषणा केली आहे. तसेच पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्ताराचे कामही आधीच सुरु झालं असल्याचेही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. सध्या, पायाभूत सुविधांच्या मर्यादांमुळे, विशेषतः धावपट्टीच्या लांबीमुळे पुणे विमानतळ युरोपीय देशांना थेट विमानसेवा देत नाही.

300 एकर जमीन संपादित करणार– Pune Airport

मुरलीधर मोहोळ यांनी म्हंटल कि, रनवे पुरेसा लांब नसल्याने सध्या पुण्यातून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत नाही. परंतु विस्तार प्रक्रिया सुरू झाली आहे. एकदा का हा विस्तार पूर्ण झाला कि मग पुण्यातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे, विशेषतः युरोपला सुरु होतील. या प्रकल्पासाठी सुमारे ३०० एकर जमीन संपादित केली जाईल. या भूसंपादनासाठी महाराष्ट्र सरकार ६०% खर्च उचलेल, पुणे महानगरपालिका (पीएमसी) २०%, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) १०% आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) १०% योगदान देईल. पुण्याहून युरोपला थेट उड्डाण झाल्यानंतर पुणेकरांची आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढेल.. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुद्धा हे विस्तारीकरण महत्वाचे ठरेल. सध्या युरोपला जाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबईला जावे लागते. परंतु एकदा का हि सेवा पुण्यातून सुरु झाली कि मग हेच प्रवासी पुण्यातूनच डायरेक्ट युरोपला जाऊ शकतात.

पुणे विमानतळाच्या (Pune Airport) नवीन टर्मिनलवरील कामकाज आता पूर्णपणे कार्यरत आहे, १००% उड्डाण वाहतूक जुन्या टर्मिनलवरून हलवण्यात आली आहे. जुन्या टर्मिनलचा पुनर्विकासही सुरू झाला आहे. अशी माहिती मोहोळ यांनी दिली. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबतही महत्वाचे अपडेट्स दिले. पुरंदर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल आणि पुण्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. या विमानतळासाठी महाराष्ट्र सरकारने जागा निश्चित केली असून भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे . मी देशभर प्रवास करत असलो तरी, पुणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळे पुण्याची हवाई कनेक्टिव्हिटी अपग्रेड करण्यासाठी केंद्र वचनबद्ध राहील असेही असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.