Pune-Bangalore Expressway: पुणे-बेंगळुरू द्रुतगती मार्गामुळे वेळेची होणार बचत; या 12 जिल्ह्यांतून जाणार मार्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune-Bangalore ExpressWay| केंद्र सरकारच्या (Central Government) भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे-बेंगळुरू द्रुतगती (Pune-Bangalore ExpressWay) मार्गाने दोन्ही राज्य जोडले जाणार आहेत. या मार्गाच्या निर्मितीनंतर दोन्ही राज्यातील 18 तासांचा प्रवास अवघ्या 7 तासांमध्ये करता येणार आहे. 700 किमी लांबीचा हा मार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये बांधला जात आहे. जो एकूण 12 जिल्ह्यातून जाईल. ज्यामुळे या तिन्ही भागातील लोकांचा प्रवास अधिक सुलभ होईल.

18 ते 19 तासांचा प्रवास 7 तासात होणार

महत्वाचे म्हणजे, हा मार्ग बनवण्याचा. हेतूच पुणे, मुंबई आणि बेंगळुरू ला एकत्र जोडण्याचा आहे. पुणे-बेंगळुरू द्रुतगती मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ वाचणार आहे. तसेच परिसरातील आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे. या महामार्गाच्या निर्मितीमुळे दोन्ही राज्यांतील अंतर 95 किमीने कमी होणार आहे. सध्या बेंगलोर ते पुणे असा प्रवास करायला 18 ते 19 तास लागतात. परंतु हा मार्ग बनवून झाल्यानंतर फक्त 7 तासांमध्ये ये – जा करता येईल. तसेच पुणे-बेंगळुरू द्रुतगती महामार्गामुळे वाहतूक कोंडीची समस्या ही जाणवणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगळुरू द्रुतगती महामार्ग हा 2028 पर्यंत तयार होईल. या महामार्गाच्या प्रकल्पासाठी अंदाजे 50,000 रुपये खर्च येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या महामार्गावर 6 लेन असतील. त्याचा विस्तार नंतर 8 लेनमध्ये केला जाईल. यहा महामार्गावर ताशी 120 किलोमीटर वेगाने प्रवास करता येईल. सध्याच्या घडीला या महामार्गाचे 72 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. इतर संपूर्ण काम संपण्यासाठी 2028 सालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

मार्ग कोणते असणार?? (Pune-Bangalore Expressway)

पुणे-बेंगळुरू द्रुतगती महामार्ग पुणे रिंगरोडपासून सुरू होईल. हा महामार्ग पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमधून कर्नाटकमध्ये प्रवेश करेल. पुढे बेळगाव, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर आणि बंगळुरू ग्रामीण या जाईल.