Pune Bangalore Highway : राज्यातील ‘या’ प्रसिद्ध MIDC ला जोडणार पुणे-बेंगलोर ग्रीनफिल्ड हायवे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pune Bangalore Highway : संपूर्ण देशभरात भारतमाला परीयोजनेअंतर्गत केंद्र सरकार विविध रस्ते बांधत आहे. शासनाने राज्यात समृद्धी महामार्ग, नागपूर – गोवा महामार्ग असे महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतले असताना आता पुणे -बेंगलोर ग्रीनफिल्ड हायवे बाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. पुणे ते बेंगलोर (Pune Bangalore Highway) दरम्यान ग्रीन फील्ड हायवे विकसित होत आहे. हा हायवे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्याच्या योगेवाडी एमआयडीसीला जोडला जाणार आहे.

पुणे बेंगलोर (Pune Bangalore Highway) दरम्यान तयार होणारा ग्रीनफिल्ड हायवे सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्याच्या योग्य वाडी एमआयडीसीला जोडला जाणार आहे त्यामुळे या भागातला विकास झपाट्याने व्हायला मदत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा प्रस्तावित महामार्ग योगेवाडी एमआयडीसी पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरून जातो आहे. या एमआयडीसीचे काम येत्या काही दिवसात प्रत्यक्षात सुरू होणार आहे. अशा स्थितीमध्ये हा ग्रीनफिल्ड कॉरिडॉर या एमआयडीसीला जोडला गेला पाहिजे अशी मागणी केली जात होती. या मागणीबाबत आमदार सुमनताई पाटील यांचे पत्र राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन दिले होते.

या भेटी दरम्यान प्रस्तावित पुणे बेंगलोर (Pune Bangalore Highway) ग्रीनफिल्ड हायवे योगेवाडी एमआयडीसीला जोडला जाईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती या संदर्भात लवकरच संबंधितांना निर्देश येथे दिले जातील असं त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यासहित परिसरातील विकासाला मोठा हातभार लागणार असून पुणे बेंगलोर ग्रीनफिल्ड महामार्ग (Pune Bangalore Highway) जर योगेवाडी एमआयडीसीला जोडला गेला तर एमआयडीसीच्या विकासाला हातभार लागणार आहे. सांगली तासगाव हा भाग विशेषतः द्राक्ष आणि इतर शेती उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना तर याचा फायदा होईलच शिवाय एमआयडीसी भागालाही इथला फायदा होणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी शासनाच्या या निर्णयाचा स्वागत केले आहे.