पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कारची कंटेनरला जोरदार धडक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा महामार्गावरून वेगानं वाहन चालवण्याच्या नादात भलतेच घडते. कधी गाडीवरचा ताबा आसुटतो तर कधी एखादे श्वान आडवे आले कि अपघात होतो. अशीच घटना पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रज गावच्या हद्दीत घडली आहे. या याठिकाणी सुसाट वेगात निघालेल्या कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारची थेट कंटेनरच्या पाठीमागे जोरदार धडक बसली आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हि अपघाताची घटना घडली असून यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून (एमएच 12 एस क्यू-1431) हि कार निघाली होती. कार उंब्रज गावच्या हद्दीत आली असता येथील वरदराज मंगल कार्यालया परिसरातील वळणावर कार चालकाचा ताबा सुटला. यावेळी कारने अचानक पुढे चाललेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कंटनेर तसाच पुढे गेला. तर कार महामार्गाच्या डिव्हायडरवर आदळली.

कारच्या धडकेनंतर महामार्गावर काचांचा सदा पडलेला. सुदैवाने या भीषण धडकेत कारमधील कोणीही जखमी झाले नाही. परंतु कार समोरील बाजूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी कारच्या दिशेने धाव घेतली. तसेच कारमधील प्रवाशांना कारमधून बाहेर काढले व कार महामार्गाच्या कडेला उभी केली. यानंतर काही नागरिकांनी अपघाताची माहिती उंब्रज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना दिली. माहिती मिळताच पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.