Pune News : पुणेकरांनो, आता एकाच तिकिटावर करता येणार बस आणि मेट्रोचा प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यात मोठ्या संख्येने लोक PMPML ने प्रवास करतात . त्यातच आता नव्याने सुरु झालेल्या पुणे मेट्रोने (Pune Metro) प्रवास करणाऱ्यांची संख्या  देखील दिवसेंदिवस वाढताना  दिसून येत आहे. मात्र पुणे मेट्रोत प्रवास करण्यासाठी वेगळे तिकीट आणि PMPML ने प्रवास करण्यासाठी वेगळे तिकीट दर  वेळेस प्रवाश्यांना काढावे  लागते. यात नेहमीच सुट्टया पैश्यांची अडचण पाहायला मिळते . यावर  तोडगा काढण्यासाठी लवकरच पुण्यात मेट्रो आणि PMPML मध्ये प्रवासासाठी एकच तिकीट काढण्याची सुविधा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. जेणेकरून पुण्यात प्रवास करणे अधिक सोयीस्कर होईल.

PMPML च्या बस  तिकिटासाठी  सुरु करण्यात आलेल्या QR Code सिस्टिम च्या उदघाटना दरम्यानच्या कार्यक्रमात पुणे जिल्ह्याचे सध्याचे  पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणेकरांना एकाच तिकिटामध्ये पीएमपी आणि मेट्रोमध्ये प्रवास करता येणाऱ्या सुविधेवर काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना खूप फायदा होईल,’ असे सांगितले .ही सुविधा  पुणेकरांना अधिक सुलभ प्रवास करण्यासाठी मदतगार ठरेल . जगभरात  आणि भारतात मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार होत असताना  PMPML च्या बसमध्ये प्रवास करण्यासाठी मात्र आजही नगदी पैसे  मोजावे लागतात. यामध्ये सुट्टया पैश्यासाठी बराच वेळेस चालक  आणि प्रवाश्यांना त्रास सहन  करावा  लागतो. हा त्रास कमी  करण्यासाठी PMPML च्या बस  मध्ये देखील UPI च्या माध्यमातून तिकीट खरेदी  करण्याची सुविधा  असायला  हवी  अशी  मागणी  होत होती. हीच  मागणी लक्षात  घेऊन  PMPML ने आता  QR code ची  सुविधा  PMPML च्या बस  मध्ये उपलब्ध  करून  दिली आहे.

नवीन  उदघाटन केलेल्या QR Code च्या माध्यमातून काल दिवसभरात  1431 प्रवाश्यांनी आपल्या प्रवासाचे  तिकीट काढले  ज्या माध्यमातून PMPML ला 40 हजार  743 रुपयांचे  एकूण  उत्पन्न देखील  प्राप्त झाले. येत्या काळात लवकरच  पुणेकरांना PMPML च्या बस आपल्या बस थांब्यावर  कधी  येईल याबद्दल देखील माहिती मिळेल. सध्या  20 बसेस साठी  ही सुविधा चालू असून भविष्यात 1200 बसेस  मध्ये ही सुविधा चालू करण्यात येईल. त्यासाठी गूगल  कंपनी सोबत करार करण्यात आला आहे. अशी  माहिती PMPML चे अध्यक्ष सचिन्द्र प्रताप सिंह यांनी दिली.