Pune Bus Rape Case| स्वारगेट एसटी डेपोतील (Swaget ST Depo) शिवशाही बसमध्ये (Shivshahi Bus) 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती स्वतः पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. या आरोपीच्या शोधासाठी पाचशे पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. तसेच, त्याला पकडण्यासाठी एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. आता हे बक्षीस कोणाला दिले जाणार याची माहिती पोलीस कुमारी यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुनाट गावातील नागरिकांनी आरोपीबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, मदत करणाऱ्या नागरिकांचा लवकरच सत्कार केला जाणार आहे. तसेच आरोपीविषयी अंतिम माहिती देणाऱ्या त्याच्या नातेवाईकाला एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.
स्वारगेटवरील सुरक्षा वाढवली (Pune Bus Rape Case)
या प्रकरणात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी विशेष पथक पुरावे गोळा करत आहे. तसेच, तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती करून जलदगती न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत निर्जन ठिकाणे, रेल्वे स्टेशन, टेकड्या आणि डार्क स्पॉट्स यांचे सेफ्टी ऑडिट करण्यात येत असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली आहे. महत्वाचे म्हणजे, स्वारगेट एसटी डेपोतील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी ऑडिट पूर्ण केले आहे. यासह महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस पेट्रोलिंग वाढवण्यात येणार आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी शहरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कडक उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क राहणार आहे. तसेच स्वारगेट आवरत देखील पोलीस यंत्रणा राबवण्यात येणार आहे.
नेमके काय घडले?(Pune Bus Rape Case)
गेल्या दोन दिवसांपूर्वी 27 वर्षीय पीडित तरुणी आपल्या गावाला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती. यावेळी आरोपी तिच्याजवळ गेला आणि गावाकडे जाणारी बस या बाजूला लागत नाही असे सांगून तिला दूरवर उभ्या असलेल्या बंद शिवशाही जवळ नेले. ही तरुणी बसमध्ये चढतात आरोपीने दरवाजा बंद करून तरुणीवर अत्याचार केला. यानंतर हा आरोपी तेथून फरार झाला. पुढे आपल्या सोबत घडलेल्या प्रकारासंबंधी तक्रार तरुणीने स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये केली. त्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले.