26 तारखेला कमळासमोरचं बटण दाबून अजित पवारांना शॉक द्या; भाजप नेत्याचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विनंती केली होती. पण अखेर निवडणूक लागली. त्यामुळे 26 फेब्रुवारीला कमळासमोरच बटन जोरात दाबा, अजित पवारांना 440 व्होल्टचा असा करंटच लागला पाहिजे, की पुन्हा त्यांनी चिंचवडचे नावच घेऊ नये, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अश्विनी जगतापांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवारांवर निशाणा साधला.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांची उमेदवारी जाहीर केली आहे. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनंही जोरदार कंबर कसलेली आहे. आज चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची यंग ब्रिगेड मैदानात उतरणार आहे.