Pune Crime : क्रिकेटवरून राडा अन थेट गोळीबार; पुण्यात चाललंय तरी काय??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षणाचे माहेरघर आणि नोकरीसाठी बेस्ट शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्यात मागील काही महिन्यापासून अनेक खळबळजनक घटना (Pune Crime) घडल्यात. कोयता गॅंगची दहशत, शरद मोहोळची दिवसाढवळ्या हत्या, एकतर्फी प्रेमातून दर्शना पवार हिचा खून या सर्व घडामोडींमुळे पुण्याची मोठी नाच्चकी झाली. त्यात आता आणखी भर पडली आहे. पुण्यात क्रिकेट खेळण्यावरून राडा झाला आणि त्याचे रूपांतर गोळीबारात झाल्याचे समोर आलं आहे. कात्रज भागात हा सर्व प्रकार घडला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही. परंतु या घटनेमुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडला आहे.

नेमकं घडलं काय? Pune Crime

याबात अधिक माहिती अशी कि, मंगळवारी कात्रज भागात राहत असलेल्या दोन गटात क्रिकेटचा सामना (Cricket Match) आयोजित करण्यात आला होता. मात्र सामना सुरु असतानाच दोन्ही गटामध्ये झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही गटातील खेळाडू पुन्हा बुधवारी भेटले. यावेळी एका गटात एक रेकॉर्ड वरचा गुन्हेगार होता. वाद मिटवण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये पुनः वाद झाला. यावेळी एका तरुणाने समोरच्या गटात असणाऱ्या तरुणावर गोळी चालवली, मात्र सुदैवाने ती लागली नाही. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात पळापळ झाली आणि यावेळी दोन तरुण जखमी झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान, गोळीबाराच्या घटना (Pune Gun Firing Cases) आता पुणेकरांना काही नव्या राहिल्या नाहीत. मागील आठवड्यातच पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहराजवळ रात्रीच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे हॉटेलमध्ये घुसून जेवणाला बसलेल्या या तरुणाची हत्या करण्यात आली. काही महिन्यापूर्वी शरद मोहोळ यांचीही हत्या गोळीबारातून झाली होती. त्यामुळे विद्येचे माहेरघर असलेले पुणे आता गोळीबाराचे केंद्र बनले (Pune Crime) आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.