राज्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये रेल्वेला महत्त्वाचे स्थान आहे. दररोज अनेक लोक राज्यातर्गत प्रवास करतात. अशा तर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुणे – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात आलेली आहे.
ही रेल्वे सेवा पुणे सांगली मार्गे बंद असणार आहे. 18 जानेवारी ते 12 एप्रिल पर्यंत ही सेवा पुणे सांगली मार्गे बंद असणार असल्याची माहिती मिळते आहे. तर ही एक्सप्रेस पनवेल मडगाव मार्गे दोन महिन्यासाठी सुरू राहणार आहे
काय आहे कारण?
मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत असणाऱ्या कॅसल राक ते एर्नाकुलम रेल्वे स्थानकादरम्यान काम सुरू आहे. रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या कामांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाकडून सातारा सांगली आणि मिरज मार्गे जाणारी एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे.
18 जानेवारी ते 12 एप्रिल पर्यंत ही रेल्वे सेवा पुणे- सांगली मार्गे बंद राहणार असून ही एक्सप्रेस पनवेल मडगाव मार्गे दोन महिन्यांसाठी सुरू राहणार आहे. यामुळे पुणे ते नागपूर रेल्वे सेवा 18 जानेवारी ते 12 एप्रिल आणि बेळगाव कडून पुण्याकडे जाणारी एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस 20 जानेवारी पासून 14 एप्रिल पर्यंत बंद असणार आहे. अशी माहिती मिरज रेल्वे कृती समितीकडून देण्यात आली आहे.
ही गाडी दोन महिने बंद असणार असल्यामुळे सातारा, सांगली आणि मिरज, कोल्हापूर मधून केरळला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. जर आपण एरणाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस द्वारे प्रवास करणार असाल तर दोन महिन्यांसाठी इतर मार्ग किंवा इतर वाहनांचा वापर करून प्रवास करावा लागेल.