Pune Fire : पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी आता समोर येत आहे. पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीमध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना इतकी जबरदस्त होती की (Pune Fire) या गाडीचा केवळ सांगाडाच उरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही टेम्पो ट्रॅव्हलर कंपनीच्या कामगारांना घेऊन जात होती. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे हे कर्मचारी होते आणि याच वेळेला ट्रॅव्हल्स ला आग लागली आहे. या टेम्पो ट्रॅव्हल्स मध्ये चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला (Pune Fire) आहे तर दोन जण गंभीर जखमी असून यामधील चालकाची प्रकृती देखील गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
अन दरवाजा उघडलाच नाही (Pune Fire)
विशेष बाब म्हणजे या टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये एकूण १२ कर्मचारी असल्याचे समजत आहे. आग लागल्याची घटना समजताच मागच्या दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण टेम्पो ट्रॅव्हलर चा दरवाजा लॉक झाल्यामुळे तो उघडलाच नाही आणि त्यामुळेच यामध्ये असलेल्या चार कामगारांचे होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळता अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले.
ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकली नाही. या घटनेतील दोन जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. या घटनेची चौकशी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.