Pune : मागच्या काही दिवसांपूर्वी पुण्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा होणाऱ्या खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे पुण्यातल्या अनेक भागात पूर आला होता. नदीच्या जवळची अनेक घरे दुकाने सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. काही ठिकाणी तर अगदी छातीएवढे पाणी होते. त्या भीषण स्थितीतून अद्यापही पूरग्रस्त सावरत असून पूरग्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल अशी माहिती समोर आली आहे. पुण्यातही पूरग्रस्तांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून (Pune) देण्यात आले आहे.
निकष केले जाणार शिथिल ? (Pune)
पुण्यातील पूरग्रस्तांना 25 हजार रुपये दिले जाणार असल्याचं आश्वासन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. पुण्यातील पूरग्रस्तांसाठी नुकसान भरपाईचे निकष शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं असल्याने लोकांना त्रासाला सामोरे जावे लागले होते. अनेकांच्या घरात दोन ते तीन दिवस पाणी साचून होते तर मोठ्या प्रमाणात गाळही साठला (Pune) होता.
व्यावसायिकांना मदतीचा हात (Pune)
दरम्यान व्यावसायिक आणि दुकानदारांच्या झालेल्या नुकसानासाठी ही मदतीचा हात देणार असल्याची माहिती समोर येत आहे. व्यापारी, दुकानदार यांचेही मोठ्या प्रमाणात या पुरामध्ये नुकसान झालं. मतदार यादीत नाव असलेले आणि नोंदणीकृत परवानाधारक दुकानदार यांना नुकसानीच्या 74% किंवा जास्तीत जास्त 50 हजार जि रक्कम जास्त असेल ती दिली जाणार आहे. तर टपरी धारकांचाही यात समावेश करण्यात (Pune) आला आहे. शहरातली अतिक्रमण वाढली आहेत त्यामुळे देखील पुराची तीव्रता वाढली होती. ती अतिक्रमणे देखील काढण्यात येणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. याशिवाय पूर रेषा देखील नव्याने आखण्यात येणार (Pune) आहेत.