Pune: पुणे जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी आता हाती येत असून पुणे जिल्ह्यातील पौड रोड जवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे हे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहू येथून हैद्राबादला जात होते. यामध्ये चार (Pune) प्रवासी प्रवास करीत असल्याची असल्याची माहिती आहे.
मागच्या दोन-तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण असून काहीच ठिकाणी जोरदार पाऊस पडतो आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे मात्र या खराब हवामानामुळेच हेलिकॉप्टर क्रॅश (Pune) झालं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पायलट सोबत चार जण असल्याची माहिती असून यामध्ये असलेले लोक जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी मोठी गर्दी झाली असून यातील दोघेजण गंभीर जखमी आहेत. या घटनेची माहिती समजतात पोलीस आणि (Pune) बचाव यंत्रणा पथकासह घटनास्थळी पोहोचलेली आहे.
नक्की काय घडलं? (Pune)
हेलिकॉप्टर काही वेळ घोटवड्याच्या दिशेने आकाशात घिरट्या घालत होते. अचानक हे हेलिकॉप्टर खाली पडल्यामुळे मोठा आवाज झाला. या हेलिकॉप्टरमध्ये चार जण होते. दोन जण गंभीर जखमी आहेत. ही माहिती कळताच स्थानिक आणि आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावून आले. त्यावेळी पायलट काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे. दरम्यान या घटनेची माहिती समजतात 200 ते 300 ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच कोसळलेल्या हेलिकॉप्टर च्या आजूबाजूला जाऊ नये असं आवाहन नागरिकांना केले आहे. कारण हेलिकॉप्टरचा कोणत्याही क्षणी स्फोट होऊ शकतो असे म्हटले आहे. याबाबतची माहिती प्रत्यक्षदर्शी कडून देण्यात आली आहे.
हेलिकॉप्टर चे नाव- AW 139
हेलिकॉप्टर मधील व्यक्ती-
1) आनंद कॅप्टन (जखमी) हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आली आहे
2) दिर भाटिया (प्रकृती स्थिर)
3) अमरदीप सिंग (प्रकृती स्थिर)
4) एस पी राम (प्रकृती स्थिर)
हेलिकॉप्टरची कंपनी- ग्लोबल हेक्ट्रा